shinde group : अंधेरी पोटनिवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने देखील चांगलीच कंबर कसली आहे. याचबरोबर शिवसेनेचे दोन्हीही गट चांगलेच तयारीला लागले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे.
या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जातं आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
तसेच दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. असलं असलं तरी देखील नेमकं काय होणार? हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे.
तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे. या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? असा सवाल अवघ्या राज्याला पडला असतानाच पोलमधून मोठी बातमी समोर आली आहे.
एका मराठी वृत्त वाहिनीनीने या निवडणुकीबद्दलचा ट्विटरवरुन नेटिझन्सचा कौल जाणून घेतला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कमळ विरुद्ध मशाल लढत होणार आहे, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले; कोण मारणार बाजी? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
दरम्यान, त्यावर ११२२ ट्विटराईट्सनी आपली मतं दिली आहे. यापैकी तब्बल ७९.५ टक्के नेटिझन्सनी ऋतुजा लटके यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर २०.५ टक्के ट्विटराईटना मुरजी पटेल विजयी होतील, असं म्हंटलं आहे. यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसणार असल्याचं बोललं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Nilesh Lanke : “आमदार निलेश लंकेंनी कोरोना सेंटरच्या नावाखाली अफाट माया जमवली, आता त्या पैशातून…”
Umran Malik: उमरान मलिकला संघात न घेतल्याने ब्रेट लीने निवडकर्त्यांना लगावला टोला, म्हणाला, जगातील सर्वोत्तम..
Urvashi Rautela: ऋषभ पंतच्या नावाने सतत ट्रोल झाल्याने उर्वशी रौतेला झाली दुखी, म्हणाली, माझी कोणालाच…