Share

‘त्या’ दिवशी एक्स्प्रेस वेवर नेमकं काय घडलं? त्या गाडीने का केला मेटेंचा पाठलाग? ड्रायव्हरने सांगितली खरी हकीकत…

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसवर अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मात्र काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेटे यांच्या ड्रायव्हरने आता ३ ऑगस्ट रोजी शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी सांगितले असल्याने आता हे प्रकरण अधिक वाढत चाललं आहे.

विनायक मेटेंच्या अकाली निधनामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेटे यांच्या गाडीचा नेमका कशामुळे अपघात झाला, याबद्दल अजून काहीच ठोस माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी काही आरोप केले आहेत, त्यामुळे मेटे यांचा अपघात आहे की घातपात याची चर्चा रंगली आहे.

त्यात मेटे यांचा चालक समाधान वाघमारे याने आता वेगळाच खुलासा केला आहे. मेटे यांचे ड्रायव्हर चालक समाधान वाघमारे याने शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल ,असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं वळण लागेल याबद्दल चर्चा होत आहे.

ड्रायव्हर समाधान वाघमारे म्हणाला, ३ऑगस्ट दिवशी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला होता. आमची गाडी तेव्हा ८०च्या स्पीडने चालली होती. पण त्या गाडीने जवळपास १२० किमीच्या वेगाने कट मारला.

तसेच म्हणाला, या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो की गाडी थांबवू का? मात्र साहेब म्हणाले, ते पिलेले असतील त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त ८०च्या स्पीडने होती. त्यादिवशी गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता असे सांगितले.

म्हणाला, जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर स्वतः चा जीव दिला असता, पण मेटे साहेबांना काहीच होऊ दिलं नसतं. मला वाटतं, शिक्रापूरच्या रस्त्यावरील ३ ऑगस्टचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, त्यात बरंच काही मिळू शकतं असा दावा समाधान वाघमारे याने केला.

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now