Share

शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय झालं? महत्वाची अपडेट आली समोर, १९ पैकी १७ खासदार..

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणारे मोठे बंड शिवसेनापक्षात मागील काही दिवसांपूर्वी घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० शिवसेना आमदारांनी शिवसेनेतून फुटून बाहेर येत भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले आहे. आता आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे खासदारही शिवसेनेसोबत असतील की नाही? याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. (What exactly happened in the Shiv Sena meeting? Important update)

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्या बैठकीस बहुतेक खासदार उपस्थित होते. त्यामुळे १९ पैकी १७ खासदार शिवसेनेसोबत असल्याने हे काहीसं दिलासा देणारं चित्र आहे.

या बैठकीला ५ खासदार उपस्थित राहिले नव्हते. त्यापैकी संजय जाधव वारीला गेले होते. आजारी असल्याने ते येऊ शकले नाहीत. संजय मंडलिक यांना दिल्लीला जावे लागले, त्यासाठी त्यांनी परवानगी घेतली होती. कलाबेन डेलकर पावसामुळे येऊ शकल्या नाहीत आणि भावना गवळी व श्रीकांत शिंदे आले नव्हते.

अशाप्रकारे या बैठकीमध्ये खासदारांचे संख्याबळ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत खासदार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत बहुतेक सर्व खासदार उपस्थित होते. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत या चर्चेला पूर्णविराम मिळाला, असं म्हणता येईल.

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांची मते या संपूर्ण प्रक्रियेत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी निर्णयाक ठरू शकतात. खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान करणे भाजपसाठी आवश्यक असल्यामुळे संबंधित हालचालींना वेग आलाय. उध्दव ठाकरेंची ही बैठक त्या अर्थाने फार महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

महत्वाच्या बातम्या-
विचित्र आंदोलन! आंदोलक पंतप्रधानांच्या बेडरूममध्ये खेळतायत चक्क WWE, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मोठा वाद, संजय राऊत बाहेर पडले न बोलताच निघून गेले
‘या’ 8 क्रिकेट दिग्गजांवर आहे बलात्काराचा आरोप; पांंड्यासह तीन भारतीय खेळाडूंचाही आहे समावेश

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now