Share

Kangana Ranaut : आम्ही काय घालावं याच्याशी तुमचा काय संबंध? कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगणाने फटकारले

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूड मधील वाद असो वा राजकीय विषय ती आपलं मत स्पष्टपणे मांडत असते. तिच्या परखड मतांमुळे ती नेहमी चर्चेत असते. आता ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कंगनाने महिलांच्या कपड्यांवरून आपलं मत मांडलं आहे.

कंगना रणौतने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे महिलांच्या कपड्यांवरून आपलं मत मांडलं आहे. महिलांनी कोणते कपडे परिधान करावे किंवा करू नये यावरून बऱ्याचदा लोक आपलं मत मांडताना दिसतात. आता यांनाच कंगनाने स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

झालं असं की, काही दिवसांआधी कंगनाने पांढऱ्या रंगाचा पारदर्शक टॉप परिधान केलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. तिला याच लूकवरून बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. तिने कसे कपडे परिधान केले पाहिजे हा सल्ला तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी दिला होता.

तिला तिच्या लूकवरून अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. यावर आता कंगनाने भाष्य केलं आहे. कंगना म्हणाली, स्त्रिया कोणते कपडे परिधान करतात किंवा कोणते कपडे परिधान करण्यास विसरतात हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. हा तुमचा विषय नाही.

तसेच पुढे आणखी एक फोटो शेअर करत म्हणाली, मला जे बोलायचं आहे ते मी बोलले आहे. आता मी ऑफीसला जाऊ शकते. कंगनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

सध्या कंगना आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नेहमीच ती सोशल मीडियावर चित्रपटासंबंधी माहिती शेअर करत असते. चित्रपटाची शूटिंग पुढे शेड्युल्ड करण्यासाठी चित्रपटाची टीम काम करत आहे. त्या टीमसोबत कंगनाही बसलेली दिसत आहे. मणिकर्णिका फिल्म्स निर्मित हा सिनेमा असून, कंगना स्वतः चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now