उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. ते मूळ गावी असून मंगळवारी त्याच्या आईची भेट घेतली. पाच वर्षांनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान मुख्यमंत्री योगी यांच्या आईने त्यांना काय सांगितले? मुख्यमंत्री योगी यांची बहीण शशी यांनी मिडियाशी बोलताना हा खुलासा केला आहे.(What did the mother say when Yogi Adityanath touched her feet)
मिडियाशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहीण शशी म्हणाली, आम्हाला खूप आनंद झाला की ते (मुख्यमंत्री योगी) 5 वर्षांत पहिल्यांदा घरी आले कारण ते माताजींना भेटले नव्हते. 2017 मध्ये आलेले, त्यानंतर आता मंगळवारी येथे आले. कालपासून मम्मीही खूश आणि गावकरीही खूश आहेत, लांबून लोक भेटायला येत आहेत.
आईसोबतच्या भेटीदरम्यान संभाषणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बहीण शशी यांनी सांगितलं, ‘आई म्हणाली की आधी गायची सेवा करा, बाकी जनतेची इतकी सेवा करा की जनतेच्या लक्षात राहील.’ जेवणाच्या प्रश्नावर बहीण शशी हसत-हसत पुढे म्हणाल्या की, जे अन्न सर्वांनी खाल्ले तेच अन्न योगीजींनी खाल्ले.
उत्तर प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच पाचूर गावात आले आहेत. योगी आदित्यनाथ यांची मोठी बहीण शशी पायल यांनी सांगितले की, ते लोक खूप आनंदी आहेत. योगी आदित्यनाथ यांची बहीण खुद्द त्यांना भेटू शकलेली नाही कारण तिथे अनेक लोकांची गर्दी आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी आज त्यांचा धाकटा भाऊ महेंद्रसिंग बिश्त यांचा मुलगा अनंत याच्या चुडा कर्म संस्काराला हजेरी लावली. उत्तराखंडच्या स्थानिक परंपरेनुसार केस कापण्यापूर्वी त्यांना हळद लावली जाते, त्याला स्थानिक भाषेत बांन असेही म्हणतात. मुंडन सोहळ्यात कुटुंबातील महिलांनी उत्तराखंडी लोकनृत्य सादर केले.
महत्वाच्या बातम्या-
त्यानं एकदा गावी यावं, त्याची खूप आठवण येतीये योगी आदित्यनाथ यांना 84 वर्षीय आईची आर्त हाक
योगी आदित्यनाथ यांना बहिणीचे आवाहन; म्हणाली, मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी
योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचं नाथ संप्रदाय कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?
सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत योगी आदित्यनाथ ३७ वर्षांनंतर रचणार नवा इतिहास