शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा दणदणीत पराभव करून जायंट किलर ठरले होते. याच श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही भूमिका का घेतली? हा निर्णय घेत असताना उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले? या गोष्टी आता समोर येत आहेत.(What did Thackeray say? Inside story told by MP Barane)
काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत युतीकरून शिवसेनेचे अतोनात नुकसान झाले. शिवसेनासंपर्क अभियानासाठी आम्ही दौरे केले. तेव्हा जनतेचा रोष राष्ट्रवादीवर असल्याचे दिसून आले. त्या संदर्भातला अहवाल उद्धव ठाकरेंकडे सादर केला, असं ते म्हणाले.
पुढे बारणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यावर कोणतीच भूमिका घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्यात यावा, अशी देखील मागणी झाली. तेव्हाही शिवसेना गप्प होती. भाजपा- सेना युती असावी, असे वारंवार उद्धव ठाकरेंना म्हणालो.
आताही पुन्हा तेच सांगितले. त्यावर उध्दव ठाकरेंनी तुम्हाला योग्य वाटतं ते करा, असे उत्तर दिले. भविष्याचा विचार करून मी एकनाथ शिंदे गटात सामील झालो, असे बरणे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, शिवसैनिकांना तुम्ही धीर सोडू नका. खचू नका. पक्ष संघटन मजबूत करूया, अशा प्रकारे भूमिका घेत श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले होते. परंतु शिंदे कुटुंबीयांशी त्यांचे असलेले संबंध पाहता भविष्यात बारणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे बोलले जात होते. आणि आता तसेच घडले आहे.
शिवसेना टिकवण्यासाठी बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी सेना-भाजप युती गरजेची होती. पुढचा विचार करून भाजपसोबत राहणार योग्य वाटलं म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत केले, अशी भूमिका श्रीरंग बारणे यांनी मांडली.
महत्वाच्या बातम्या-
वारं फिरलं! आदित्य ठाकरेंच्या रोड शोला तुफान गर्दी; बंडखोरांना धडकी तर शिवसैनिक झाले चार्ज
रणवीरसिंगच्या न्युड फोटोनंतर बडा राजकीय नेता संतापला; उपस्थीत केला ‘हा’ सवाल
“पुरंदरेंइतका अन्याय शिवरायांवर कुणीच केला नाही, रामदास व दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”