Share

मुलगी झाल्याचा आनंद गगणात मावेना, शेतकऱ्याने पुर्ण गावात वाटली तब्बल दीड क्विंटल जिलेबी

jellies

सध्या समाजात मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो. बेटी म्हणजे धनाची पेटी असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला “नकोशी” केले जाते आणि मुलीचा जन्मचं नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे.

मात्र सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत. माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रासवे कुटुंबीयांनी कन्यारत्नाचे गावात मिरवणूक काढून स्वागत केले आहे. मोठेवाडी येथील प्रगतीशील शेतकरी अशोक नाथाराव रासवे आणि पत्नी सारिका या दाम्पत्याला मुलगी झाली.

आनंदाची बाब म्हणजे या कन्यारत्नाचे त्यांनी अनोखे स्वागत केले. तब्बल दीड क्विंटल जिलेबी वाटून त्यांनी मुलीचे स्वागत केले. कन्यारत्नाचे अनोखे स्वागत रासवे कुटुंबाने एक वेगळाच आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मुलगी झाली म्हणून तीचे अशा पध्दतीने केलेल्या स्वागताचे परिसरात कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी वाळूजमध्ये डॉक्टर दांपत्य डॉ. प्रसाद हराळ पाटील डॉ. पूजा हराळ पाटील यांनी मुलीच्या जन्माचे आगळेवेगळे स्वागत केले. डॉ. हराळ यांनी रुग्णालय परिसरात पेढे वाटून लेकीच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा केला होता. समाजातील प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, या उद्देशाने त्यांनी स्त्रीभ्रूणहत्या विरोधी तसेच स्त्री जन्माचे स्वागत करणारे पोस्टर्स तयार केले होते.

दरम्यान, खेड तालुक्‍यातील चाकण येथील गवते कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत फुलांच्या पायघड्या टाकुन त्या नवाजात बालिका आणि तिच्या आईला औक्षण करत त्याचे स्वागत केले होते. चाकण येथील माधुरी योगेश गवते व योगेश गुलाबराव गवते या दाम्पत्याला पाहिला मुलगा आणि दुसरी मुलगी झाली आहे.

एकीकडे स्त्री भ्रूण हत्त्येचे प्रमाण कमी व्हावे आणि मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे खरच कुठं तरी समाजाची मानसिकता बदलत आहे याचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळाल आहे. मुलीच्या जन्माचे अनोख्या पध्दतीने स्वागत करत एक आदर्श घालून दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना विजयी, नगराध्यक्षपद मात्र १ जागा जिंकलेल्या काँग्रेसकडे; पहा कुठे झाली ही कमाल
राज ठाकरेंना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणत मनसेची बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
खाण्या-पिण्यातील ‘या’ पाच चुकांमुळे पुरुषांचे गळतात केस, आजच आपल्या आहारात करा बदल
बीडच्या आमदारावर चढला ‘पुष्पा’ Fever, मैं झुकेना नहीं म्हणत गाजवली सभा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now