अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (डेप्युटी NSA) दलीप सिंग नुकतेच भारत दौऱ्यावर होते. दलीप यांनी गुरुवारी भारताविरोधात वक्तव्य केले. ते म्हणाले, चीनने LAC चे उल्लंघन केले तर रशिया भारताच्या मदतीला धावून येईल यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
याबाबत भारतातील तज्ज्ञांनी अमेरिकेला सल्ला दिला आहे. युरोपियन युनियनमधील माजी राजदूत भास्वती मुखर्जी(Bhaswati Mukherjee) म्हणतात की, जो पाश्चात्य देश स्वतः रशियन तेलावर अवलंबून आहे, त्यांची भाषणे आपल्याला ऐकावी लागत नाहीत. दलीप सिंग(Dalip Singh) यांनी आपल्या मर्यादेत राहायला हवे होते.
जगाला माहित आहे की युरोपीय देश गॅस आणि तेलाच्या बाबतीत 75% रशियावर(Russia) अवलंबून आहेत. भारत रशियाकडून फक्त 2% तेल खरेदी करतो. त्याचे परिणाम जर कोणाला भोगावे लागत असतील तर ते पाश्चिमात्य देश आहेत, आपण नाही. रशिया, अमेरिका आणि चीनसारख्या बड्या शक्तींसोबत भारताच्या संबंधांबाबत गेल्या 48 तासांत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
युक्रेनवरील लष्करी कारवाईच्या 37 व्या दिवशी भारतात आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी अत्यंत महत्त्वाची मॅरेथॉन बैठक(Marathon meeting) झाली. तीच गोष्ट अमेरिका आणि पाश्चात्य देशांना सतावत आहे. त्यामुळे अमेरिकेचे डेप्युटी एनएसए दलीप सिंग यांनी भारताला एक प्रकारची धमकी दिली आहे. हे करून दलीप सिंह यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांचे विधान कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाऊ शकत नाही.
माजी लष्करप्रमुख जनरल व्हीपी मलिक(VP Malik) म्हणाले, दलीप सिंह यांच्या वक्तव्यावरून अमेरिकेचा रोष दिसून येतो. एक काळ असा होता जेव्हा भारताला 75% संरक्षण उपकरणे रशियाकडून मिळायची. आताही रशियासोबत 48 टक्के संरक्षण करार केले जात आहेत. रशियाशी आपले संबंध केवळ खरेदी-विक्री करणारे नाहीत हे अमेरिकेला माहीत आहे.
अमेरिकेला हे कळायला हवे कि, 1962 पासून आजपर्यंत आम्ही चीनशी थेट मुकाबला केला आहे आणि पुढेही करू. अमेरिका स्वतःला युक्रेनचा सर्वात मोठा समर्थक म्हणून सांगत होती, पण रशियाने हल्ला केल्यावर युक्रेनला लढण्यासाठी एकटे सोडले.






