गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीचा आलेख वरती जाताना दिसला. सर्व सामान्यांच्या खिशावर याचा मोठा परिणाम झाला. मात्र, काल केंद्र सरकारने पेट्रोलच्या किंमतीत 8 रुपयाने तर डिझेलच्या किंमतीत 6 रूपयाने कपात करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पेट्रोल डिझेलचे शुल्क अजून कमी करावे अशी मागणी केली आहे.
अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांची ओरड सुरू होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने महागाईवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि काल पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये कपात केल्याची घोषणा केली.
केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपयांनी कमी करीत आहोत. अशी घोषणा केली. त्यामुळे आता पेट्रोल 9.5 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरवरही 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्राने दिला.
आता केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आणखी कपात करावी यासाठी मागणी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलचा अबकारी कर प्रतिलिटर 18 रुपये 42 रुपये इतका वाढविला होता.
https://www.facebook.com/100064871040647/posts/378139154358450/
आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील 18 रुपये 42 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2022
तसेच, आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता 6-7 वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. दरम्यान, सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारकडून तरी पेट्रोल-डिझेलच्या दरावर कोणत्याही प्रकारची कर कपात केली जाणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.