Share

‘आम्ही क्राईम ब्रांचचे पोलिस, अंगावरचे दागिने काढून डिकीत ठेवा’, बघता बघता महिलेची झाली फसवणूक

crime

जालना शहरातील म्हाडा कॉलनी भागातील ही घटना आहे. एका महिलेला अडवून आम्ही क्राइम ब्रांचचे पोलिस आहोत असे सांगितले. तिला म्हणाले की, आम्हाला तुमच्या गाडीची डिक्की तपासायची आहे. रस्त्यात पुढेही तपासणी चालू आहे.(‘We, the crime branch police, take off the jewelery and keep it in the shop’ )

यादरम्यान त्या महिलेला सांगितले की, तुमच्या अंगावरचे दागिने काढून डिक्कीत ठेवा. महिलेनेही त्या लोकांनी सांगितल्या प्रमाणेच केले. त्या भामट्यांनी डिक्कीत दागिने ठेवताना त्या महिलेची दिशाभूल केली. त्यानंतर ते भामटे दागिने घेऊन पळाले.

जवळजवळ सव्वा लाख रुपयांचे दागिने त्या भामट्यांनी लंपास केले. जालन्यातील अमरछाया टॉकिज जवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली. भरदिवसा अशी घटना घडल्यामुळे महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालना शहरातील म्हाडा कॉलनीमधील लीला मदनलाल सोनी या दुपारी १२ वाजेच्या सुमारास भाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांना अमरछाया टॉकिज जवळ दोन भामट्यांनी अडवले. त्यांना म्हणाले की आम्ही क्राइम ब्रांचचे पोलिस आहोत. रस्त्यामध्ये पुढेही तपासणी सुरु आहे. आम्हाला तुमच्या गाडीची डिक्की तपासायची आहे. आम्हाला डिक्की चेक करुद्या. नंतर त्या महिलेला ते भामटे म्हणाले की, तुमच्या अंगावरचे दागिने काढून डिक्कीत ठेवा.

महिलेने हातातील अंगठी, बागड्या, गळ्यातील हार सगळे सोने काढून डिक्कीत टाकले. सर्व सोने सुमारे १ लाख १७ हजार रुपये किंमतीचे होते. भामट्यांनी केलेल्या बनवाबनवीत लीला सोनी फसल्या आणि त्यांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचे सोने गमावले.

याप्रकरणी सोनी यांनी तातडीने सदर बाजार पोलिस ठाणे गाठले. यानंतर सोनी यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केली. याप्रकरणाची सर्व माहिती सोनी यांनी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ भताने, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ हे तातडीने घटनास्थळी गेले. वेगवेगळ्या टीम तपासासाठी रवाना केल्या. घटनेचा तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या
रमेश देव यांच्या निधनानंतर लेक झाला भावूक, म्हणाला, ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद दिवस’
‘या’ विद्यार्थ्याने गुगललाच हादरवले, शोधला असा bug की कंपनीने दिली मोठी जबाबदारी, वाचून अवाक व्हाल

क्राईम

Join WhatsApp

Join Now