“शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही” ९२ वर्षीय आजीबाईंचा मातोश्रीबाहेर पहारा

सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्यांमध्ये आणि आघाडी सरकारमध्ये नवीन वाद पाहिला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. राणा दांपत्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमकांची भूमिका घेतली आहे. अनेक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पहारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मुंबई पोलिसांनी देखील आपला कडक बंदोबस्त लावला आहे. अशातच ९२ वर्षीय आजीबाई देखील मातोश्रीबाहेर पाहारा देण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. या ९२ वर्ष आजीबाईंनी एबीपी माझाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना चांगलेच सुनावले आहे.

या आजीबाईंनी म्हटले आहे की, “राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देत आहेत ना, म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? माझं वय ९२ वर्ष आहे. आमच्या साहेबांवर संकट आलेलं आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार.”

तसेच, “राणांना वाटत असेल दोघजण येऊन आम्ही गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही येऊन दाखवाच. मातोश्रीवर येऊन दाखवच.” असे आवाहन या आजीबाईंनी राणा दांपत्याला केले आहे. एबीपी माझाशी बोलताना या आजीबाईंनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

या आजीबाईंनी राणा दांपत्याला इशारा देत, “मी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासूनच मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते मी. काही लोकं उद्धव साहेबांना सारखं छळतायत. त्यांना मी सांगते, आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही. त्यांना छळू नका. ते जनतेसाठी चांगलं काम करत आहेत. ते तुमच्यासारखी लबाडबाजी करत नाहीत.” असे म्हणले आहे.

दरम्यान स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या या आजीबाईंनी सकाळपासून मातोश्रीबाहेर पहारा लावला आहे. त्यांच्यासोबत शिवसैनिकांचा घोळका देखील मातोश्रीबाहेर जमला आहे. दुसरीकडे हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी राणा दांपत्य सज्ज झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
यापुढे कुणी शिवसेनेच्या नादाला लागाल तर आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून या; शिवसेनेची थेट धमकी
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या..
झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार
आलियाला सून बनवण्यासाठी कपूर कुटुंबाला साईन करावे लागले हे कॉन्ट्रॅक्ट, वाचा काय लिहीलंय त्यात?