शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर यवतमाळमध्येही शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदेंना समर्थन दिले आहे. भावना गवळी यांचा आख्खा गट शिंदे यांच्या गटात अधिकृतरित्या सामील झाला आहे.
शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या धक्कादायक बाब म्हणजे, भावना गवळी यांच्या सोबत 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते आहे. विशेष बाब म्हणजे, बाभूळगाव नगर पंचायतीचे नगरसेवक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.
शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर भावना गवळी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या. गद्दार असे त्यांना संबोधित करण्यात आले. त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला आता त्यांनी स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनेत आहोत. याउलट आम्ही शिवसेना-भाजप युती अखंड करण्याच काम केल्याच त्यांनी म्हंटलंय.
ठरल्याप्रमाणे काल भावना गवळी यांनी वाशिम या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. अन् जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. विशेष बाब म्हणजे, तब्बल एक वर्षाने मतदारसंघात आल्यावर देखील त्याचं मतदारसंघात जोरदार स्वागतही करण्यात आलं आणि रॅलीही काढण्यात आली.
यावेळी बोलताना भावना गवळी यांनी म्हंटलं आहे की, ‘लोक म्हणतात आम्ही गद्दार आहोत. मात्र शिवसेना आम्ही उभी केली आमच्या बापानं उभी केली. आमच्या वडिलांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून या ठिकाणी ही शिवसेना दिसते आहे. कोणाचा तरी त्याग होता, म्हणून ही शिवसेना वाढली.’
दरम्यान, ‘आमच्यासोबत १२ तेरा खासदार बाहेर पडतात. ४० आमदार बाहेर पडतात. याचं आत्मचिंतन आता शिवसेनेने केलं पाहिजे. या मतदारसंघात पुन्हा एकदा भगवा तुमच्या आशीर्वादानं फडकवल्याशिवाय राहणार नाही, मी लढणारीच नव्हे तर लढून जिंकणारी आहे, असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या