Share

आम्ही त्यांना असं अमृत पाजलय की त्यांची गाडी.., नितीन गडकरींचे एकनाथ शिंदेंबद्दल मोठे वक्तव्य

एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमदारांसह भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली, आणि महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच राज्याच्या प्रगतीसाठी अनेक घोषणा केल्या, अनेक निर्णय घेतले.

यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या’ संकल्प से सिद्धी’ या परिषदेत नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे काम आणि राज्याच्या प्रगतीवर भाष्य केलं.

नितीन गडकरी म्हणाले, अमृत महोत्सवानिमित्ताने आम्ही एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजले आहे की आता त्यांना अमरत्व प्राप्त झाले. आता महाराष्ट्रच्या विकासाची यात्रा बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने जाईल. त्यांची गाडी सुसाट जाईल, गाडी आता थांबणार नाही.

तसेच म्हणाले, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे.

सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

तसेच म्हणाले, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरीमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. नरिमन पॉईट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या १२ तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे, असे गडकरी म्हणाले.

समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण होणार आहे. मात्र, यावेळी नितीन गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now