उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही, असे एकनाथ शिंदे गटातील आमदार म्हणाले होते. मात्र शिंदे गटाच्या वकिलांनी प्रथमच सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नसल्याचा दावा केला आहे. (We don’t accept Uddhav Thackeray’s leadership but let’s look at the bow)
सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही निवडणूक आयोगाकडे कशासाठी गेला? त्यावर उत्तर देताना हरीश साळवे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे पक्षाचे चिन्ह कोणाला मिळावे, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो.’
पुढे बोलताना हरीश साळवे यांनी हा सर्व शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. यावर बोलण्याची गरज नाही. परंतु ‘पक्षातील एका गटाला नेत्याचे नेतृत्व मान्य नसेल तर, त्याला नेता बदलण्याचा अधिकार नाही का?’ असा युक्तिवाद केला.
आज न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षातील वकिलांनी युक्तिवाद केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हंटले की, ‘पक्षप्रमुखांनी बैठक बोलावली. त्याला गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई होऊ नये का? तसेच दोन तृतीयांश बहुमत असले म्हणजे तो पूर्ण पक्ष असा त्याचा अर्थ होत नाही.’
‘जर असे झाले तर परिशिष्ट दहाला काहीच अर्थ उरणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार या लोकांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणे, हाच पर्याय यांच्यासमोर आहे,’ असा युक्तिवाद शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला.
त्यावर युक्तिवाद करताना हरीश साळवे म्हणाले की, ‘आम्ही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे आमच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. तसेच पक्षातील एका गटाला नेतृत्व मान्य नसेल तर, त्याबाबत मतभेद व्यक्त करण्यात काय हरकत आहे?’ युक्तिवाद करताना शिंदे गटाच्या वकिलांनी केलेले हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात आता कोणते नवे वादळ निर्माण करेल हे येत्या काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचा राजीनामा ही मोठी घोडचूक?; पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवला होता अंदाज, कोर्टात आज झालं ते सिद्ध
‘म्हसोबाला नाही बायको अन् सटवाईला नाही नवरा’; पडळकरांची आदित्य ठाकरेंवर खोचक टिका
Uddhav Thackeray: “शिवसेनेने अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे”