Share

आमचीच लायकी नाही, जमलं तर माफ करा बाबासाहेब! आंबेडकर जयंतीनिमित्त हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. सोशल मीडियावर अनेकांनी डॉ बाबासाहेब यांचा फोटो टाकत त्यांना अभिवादन केले आहे. त्यातच आता अभिनेत्री हेमांगी कवी हिनं देखील आंबेडकर यांचा फोटो फेसबुक वरती पोस्ट केला आहे. तिनं फोटोसोबत काही मजकूर लिहिला आहे, ज्यामुळे तिची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यावर मर्यादा होत्या. मात्र यंदा राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे.

हेमांगी कवीनं फेसबुकच्या माध्यमातून आंबेडकरांना अभिवादन केले. यासाठी आंबेडकर यांच्या फोटो टाकत तिनं काही मजकूर लिहिला आहे. सध्या तिनं लिहिलेल्या या मजकुरामुळे तिची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हेमांगीने पोस्ट करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागितली आहे.

तिने केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!”सध्या तिच्या या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5576021802417403&id=100000289144138

तिच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘कमी पडतीयेस तर तू आत्मक्लेश कर, बाबासाहेब जगणारे आणि फक्त अटेंशन सेंट्रिक म्हणून बाबासाहेब मानणारे या दोन वृत्ती मध्ये खूप फरक आहे हेमांगी. जमलं तर बाबासाहेब जगून बघ, कुठलाही प्रमाणभाषेतला माई का लाल तुला ट्रोल करणार नाही. जयभीम!’

तर एकाने लिहिले की, ‘आंबेडकर आपण सगळ्यांनी वाचले, पण ज्यांना समजले त्यांनी ना कधी आंबेडकरांना ‘जाती’ त गुंतवलं, ना कधी स्वतः ‘जाती’ त अडकून पडले,’ असे एका नेटकऱ्याने तिच्या पोस्टवरती प्रतिक्रिया दिली आहे. हेमांगी नेहमीच वेगवेगळ्या विषयावर आपली मतं मांडत असते.

इतर

Join WhatsApp

Join Now