गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही प्रकारची भाषा ऐकायला मिळतेय. भावी पिढ्यांनी अशा नेत्यांकडून काय शिकावे. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला होता. मात्र संजय राऊतांनी राज ठाकरेंना जबरदस्त प्रतिउत्तर दिले आहे.(We are not as silent as you when ED’s notice comes;)
पुण्यात मनसेचा १६ वा वर्धापनदिन साजरा झाला आहे. त्यानिमित्त आयोजित सभेत राज ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला. संजय राऊतांची भुवया उडवून नक्कल करत राज यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
राज यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. ‘आमचं राजकारण नकलांवर उभं नाही, आमचं राजकारण कामावर आणि संघर्षावर उभं आहे,’ असा पलटवार राऊत यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून कारवाई चालू आहे.
ही कारवाई राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेत्यांवर सुरू आहे. या कारवाईवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आम्ही खरं ते बोलणार आणि सत्य ते मांडणार.
ईडीने चौकशीसाठी बोलावलं म्हणून आम्ही शांत बसलो नाही, आम्ही कोणाचे मिंधे नाही. ईडीची नोटीस आली म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही बोलत राहिलो. आवाज उठवत राहिलो,’ असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
तसेच मनसेच्या वर्धापनदिनी बोलताना पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं की, सोळावं वरीस विरोधकांसाठी धोक्याचं आणि मनसेसाठी मोक्याचं आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी फक्त ‘पाहू’ असं म्हणत उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
शेअर बाजाराने केले भाजपच्या विजयाचे स्वागत; सेंसेक्सने घेतली जबरदस्त उसळी
लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करणाऱ्या सोनू सूदची बहिण मालविका निवडणूकीत पिछाडीवर