Share

महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ भाऊ, उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत- के चंद्रशेखर

udhav thackeray

रविवारचा (20 फेब्रुवारी) संपूर्ण दिवस हा दोन मुख्यमंत्र्यांच्या एकत्र भेटीने लक्षणीय ठरला. रविवारी (20 फेब्रुवारी) तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. देशाच्या राजकीय वर्तुळाचं ज्या भेटीकडे लक्ष लागलं होतं, अखेर रविवारी ही भेट झाली. (we are going to fight for democracy now said telangana cm k presented by chandrasekhar rao)

या चर्चेदरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे वर्षा निवासस्थानी गेले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषद घेतली. देश ज्या पद्धतीने चालवला जात आहे ते योग्य नाही, विकासाच्या मुद्यावर एकत्र काम करायला हवं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत झालं आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत.’ यावेळी बोलताना केंद्रातून भाजपला सत्तेतून घालवण्याच्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असल्याचे संकेत त्यांनी दिले.

यावेळी बोलताना के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरुद्ध दंड थोपटले. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही, नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, देशात भाजपला हटवून परिवर्तन आणण्यावर आणि त्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यावर दोघांमध्ये सहमती झाली. राव हे नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटले आणि आपल्या मोहिमेला पवार यांनी आशीर्वाद दिल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विशेष बाब म्हणजे, या दोन्ही भेटी म्हणजे नव्या मोर्चाची सुरुवात आहे आणि आम्ही लवकरच पुन्हा भेटू असंही ते म्हणाले. पुढची भेट उद्या-परवाच होऊ शकते, असंही ते म्हणाले. या भेटी आताच आणि एवढ्या वेगाने का होत आहेत? याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान? के. चंद्रशेखर रावांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, काय घडलं या भेटींमध्ये?
तुमच्या बुद्धीला ताण द्या आणि यामध्ये दडलेला आकडा सांगा, ९९% लोकं झालेत फेल
केसीआर यांच्या बैठकीला आदित्य ठाकरेंच्या जागी तेजस ठाकरेंनी लावली हजेरी
विहीरीजवळ नाचगाणे करणे पडले महागात, 13 जणांचा विहीरीत पडून मृत्यु, ऍम्बुलन्सलाही झाला उशीर

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now