Share

वॉशिंग्टन सुंदरने ठोकल्या ६ चेंडूत ३० धावा; सुंदरच्या तुफानात न्युझीलंड उद्धवस्त

washington sundar

ND vs NZ 1st Odi Match: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या ODI मध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 50 षटकात 7 विकेट गमावून 306 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या.

त्यासोबतच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने धडाकेबाज कामगिरी करत सर्वांची मने जिंकली. त्याला ७व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत वॉशिंग्टन सुंदरने 231.25 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले.

त्याचप्रमाणे, टीमचा डॅशिंग अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषक 2022 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. जडेजाच्या जागी या मालिकेत खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने आपल्या बॅटने धडाकेबाज खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कप 2022 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. टी-२० विश्वचषकातही तो संघाचा भाग नव्हता.

https://twitter.com/PrimeVideoIN/status/1596013417030389761?s=20&t=_tjc4XxvNhDiQczPUY-IFg

जडेजा यापुढे बांगलादेश दौऱ्यावरही टीम इंडियाकडून खेळताना दिसणार नाही. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्ध जडेजाच्या अनुपस्थितीत स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपली ताकद दाखवली आहे. फिनिशरची भूमिका बजावताना त्याने धडाकेबाज खेळी खेळली. ३६ पैकी ३० धावा तर त्याने अवघ्या ६ चेंडूत केल्या.

https://twitter.com/ICC/status/1596009337230598146?s=20&t=JodWpqQvAutAtwZkdWBQuQ

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 7 विकेट गमावून 306 धावा केल्या. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80, शिखर धवनने 72 आणि शुभमन गिलने 50 धावा केल्या.

दुसरीकडे न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या. मात्र, या सामन्यादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची फलंदाजी.

ऋषभ पंत पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि त्याने 23 चेंडूत 15 धावा केल्या. दुसरीकडे, वॉशिंग्टन सुंदरने शेवटच्या षटकात जबरदस्त फलंदाजी करत 16 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.

वॉशिंग्टन सुंदरने ही झटपट खेळी खेळली नसती तर कदाचित टीम इंडियाला ३०० चा आकडा गाठता आला नसता. वॉशिंग्टन सुंदरच्या या धडाकेबाज खेळीचे सर्वत्र कौतूक होत आहे. तर पंतवर मात्र टिका होत आहे.

महत्वाच्या बातम्या
Nilesh rane :..ठाकरे कुटूंबातील कुठल्या सुंदर व्यक्तीमुळे मर्डर झाला? हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, राणेंचे खळबळजनक विधान
दहशतीचे दुसरे नाव म्हणजे ‘वसिम बशीर’; कश्मीरमधून आणखी एक स्पिडगन टिम इंडीयात दाखल
धोनी पुन्हा एकदा टिम इंडीयाला वर्ल्डकप जिंकवून देणार; आगामी ट्वेंटी वर्ल्डकपसाठी BCCI चा मोठा निर्णय

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now