एका कार्यक्रमात पैसे घेऊन हजर न राहिल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुरादाबाद, यूपी येथील ACJM-4 च्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले. सतत न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.(warrant issued against Sonakshi Sinha)
मुरादाबाद येथील रहिवासी असलेल्या प्रमोद शर्मा यांनी 2018 मध्ये मुरादाबादमधील कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरुद्ध 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सोनाक्षी सिन्हाला अटक करून तिला 24 एप्रिलला कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
विमानाच्या तिकिटाचे पैसे भरूनही सोनाक्षी सिन्हा दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहिली नाही, असा आरोप प्रमोद शर्मा यांनी केला आहे. मुरादाबादच्या कटघर पोलीस स्टेशन परिसरात राहणारे प्रमोद शर्मा यांनी चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून ‘इंडिया फॅशन अँड ब्युटी’ अवॉर्डसाठी आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीतील श्री फोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार होता.
सोनाक्षी सिन्हाने यासाठी सोशल मीडियावर एक प्रमोशन व्हिडिओही जारी केला होता. कार्यक्रमाला येण्यासाठी 29 लाख 92 हजार रुपये मोजण्यात आले होते. याबाबत प्रमोद शर्मा यांनी 2019 मध्ये काटघर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, परंतु तक्रार नोंदवून न घेतल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर, सोनाक्षी सिन्हा या प्रकरणासंदर्भात आपले म्हणणे नोंदवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी मुरादाबादला आली होती. एका हॉटेलमध्ये दोन तास थांबल्यानंतर तिचा जबाब नोंदवून ती निघून गेली. प्रमोदने या संपूर्ण प्रकरणाची दोन वेळा मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनाक्षी सिन्हावर कलम 420, 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी सिन्हा डिजिटल डेब्यू करणार आहे. ती दोन वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. त्यापैकी एकाचे नाव फॉलेन आहे आणि ही वेब सिरीज Amazon Prime Video वर दिसणार आहे. सोनाक्षीचे चाहते तिचे काम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
एका कार्यक्रमात पैसे घेऊन हजर न राहिल्याबद्दल कायदेशीर कारवाईला सामोरे जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुरादाबाद, यूपी येथील ACJM-4 च्या न्यायालयातून वॉरंट जारी करण्यात आले. सतत न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
मुरादाबाद येथील रहिवासी असलेल्या प्रमोद शर्मा यांनी 2018 मध्ये मुरादाबादमधील कटघर पोलिस ठाण्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरुद्ध 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सोनाक्षी सिन्हाला अटक करून तिला 24 एप्रिलला कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
विमानाच्या तिकिटाचे पैसे भरूनही सोनाक्षी सिन्हा दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहिली नाही, असा आरोप प्रमोद शर्मा यांनी केला आहे. मुरादाबादच्या कटघर पोलीस स्टेशन परिसरात राहणारे प्रमोद शर्मा यांनी चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून ‘इंडिया फॅशन अँड ब्युटी’ अवॉर्डसाठी आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीतील श्री फोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार होता.
सोनाक्षी सिन्हाने यासाठी सोशल मीडियावर एक प्रमोशन व्हिडिओही जारी केला होता. कार्यक्रमाला येण्यासाठी 29 लाख 92 हजार रुपये मोजण्यात आले होते. याबाबत प्रमोद शर्मा यांनी 2019 मध्ये काटघर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, परंतु तक्रार नोंदवून न घेतल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर, सोनाक्षी सिन्हा या प्रकरणासंदर्भात आपले म्हणणे नोंदवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी मुरादाबादला आली होती. एका हॉटेलमध्ये दोन तास थांबल्यानंतर तिचा जबाब नोंदवून ती निघून गेली. प्रमोदने या संपूर्ण प्रकरणाची दोन वेळा मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनाक्षी सिन्हावर कलम 420, 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सोनाक्षी सिन्हा डिजिटल डेब्यू करणार आहे. ती दोन वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. त्यापैकी एकाचे नाव फॉलेन आहे आणि ही वेब सिरीज Amazon Prime Video वर दिसणार आहे. सोनाक्षीचे चाहते तिचे काम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सुपरहिट!झुंडने चित्रपटगृहात घातलाय धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी
मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे श्रद्धा कपूर, महिन्याची कमाई एकून तोंडात बोटं घालाल
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..