महाराष्ट्रात मंगळवारी सकाळी एका अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार पुलावरून कोसळल्याने मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे २० ते ३५ वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना वर्धा (wardha) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (wardha deoli accident news 7 died)
सध्या सर्व मृतदेहांचं पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. मध्यरात्री 40 फूट खोल खड्ड्यात विद्यार्थ्यांची गाडी पडली होती, त्यामुळे मोठा अपघात झाला. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून एक्सयुव्ही गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द पाळला; मिनी जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रयला दिली बोलेरो गाडी भेट…
आजोबांना कोरोना झाल्यानंतर रोहित पवार झाले भावूक; म्हणाले, एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण..
लतादीदींना आताच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला तर आहे ‘हा’ धोका, स्वत: डॉक्टरांनीच केला खुलासा
“इतक खोटं करायचं कि ते उघडं नागडं होऊन समोर येतं, याचा अर्थ किरण माने चुकलेले नाही”