हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांना तलवार व रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची ही घटना आहे. ही घटना २३ फेब्रुवारीला बेलवाडीतील शिवारात घडली आहे. या घटनेविषयी आरोप दाखल होताच आरोपींनी पळ काढला आहे.(‘Wanted’ posters for law enforcement children;)
शोध घेऊनही आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी हिंगोलीतील चौकात चार आरोपींच्या वाँटेड बॅनर लटकविले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन आरोपी हिंगोली पोलीस दलातील अधिकाऱ्यांची मुलं आहेत. हिंगोली तालुक्यातील बेलवाडी शिवारातील शेतात तानाजी बांगर यांचा आखाडा आहे.
२३ फेब्रुवारीला या आखाड्यावर शिवम सुरेश कुरील असताना सागर काळे, विकी काळे, अभय चव्हाण, अक्षय गिरी हे आखाड्यावर आले. हे सर्व हिंगोलीतच राहणारे आहेत. जेव्हा हे सर्वजण आखाड्यावर गेले त्यावेळी या पाचही जणांनी तलवार व कोयत्याने शिवम कुरीलला मारहाण केली.
लोखंडी रॉडने पायावर शिवमच्या पायावर मारून त्याला जखमी केले. साक्षीदारालाही तलवार, कत्ती व रॉडने मारहाण केली. यातील दोन आरोपी पोलिस अधिकाऱ्यांची मुले आहेत. याप्रकरणी शिवम कुरील याने दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर हिंगोली पोलिस ठाण्यात तक्रार केली.
या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपींनी पळ काढला आहे. यातील सागर काळे, विकी काळे, करण राजपूत व अक्षय गिरी हे चार आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी वॉन्टेड म्हणून त्यांचे बॅनर हिंगोलीच्या गांधी चौकात लावले आहेत.
यातील सागर काळे व विकी काळे हे दोन आरोपी हिंगोली पोलीस दलातील अधिकाऱ्याची मुले असल्याची माहिती समोर येत आहे. पाच पैकी दोन आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र इतर आरोपींचा पोलिसांना अजूनही शोध लागला नाही.
महत्वाच्या बातम्या
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ‘मॅजिक’ दाखवणार? पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लॉप शो
गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता; सुरवातीच्या पिछाडीनंतर घेतली जोरदार आघाडी