जर तुमचा जुना पंखा हवा नीट फेकत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. इलेक्ट्रिशियनच्या मदतीशिवाय तुम्ही तुमच्या पंख्याचा वेग स्वतः वाढवू शकता. हे काम करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. एवढेच नाही तर या युक्तीने तुम्ही तुमच्या घराचे वीज बिलही कमी करू शकाल.
नुकताच कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत घराघरांत पंखे आणि कुलरही सुरू झाले आहेत. पण काहींच्या घरात हाय व्होल्टेज असूनही घरातील पंखे नीट हवा देत नाहीत. उन्हाळा सुरू होताच या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मोठी चिडचिड होते.
जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमचा पंखा कमी हवा फेकत आहे आणि पॉवर युनिट्स तितकेच खर्च होत आहेत, तर फॅनकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. इतर ऋतूत एसी, पंखे, कुलर वगैरेकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. म्हणूनच उन्हाळ्याच्या सुरुवातीला सर्व इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
मात्र, या गोष्टींची दुरुस्ती करणं अनेकांना खर्चिक वाटतं. दुसरीकडे इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमती वाचून घाम फुटतो. अशी स्थिती असताना, आम्ही तुम्हाला एक खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही केवळ एका मिनिटात जुन्या पंख्याचा वेग वाढवू शकत नाही, तर त्याद्वारे वीज बिल देखील कमी करू शकता.
अभ्यासकांच्या मते पंख्याच्या पात्यांची रचनाच अशी असते ज्यामुळं हवेचा प्रवाह दुभागला जातो. अशा परिस्थिती धूळ- मातीच्या कणांमुळं पंख्याच्या पातीची धारदार बाजू बोथट होते. ज्यामुळं पंख्याची क्षमता घटते आणि त्याचा वेग कमी होतो. पंख्याची मोटर जास्त वीज खर्ची घालण्याचं काम करते आणि याचे परिणाम वाढलेल्या वीज बिलात दिसते.
यासाठी ट्रिक म्हणजे, पंख्यांचे पाते सातत्यानं ओल्या कपड्यानं स्वच्छ करा. स्वच्छ करताना पात्यावर जास्त जोर देऊ नका. हाच नियम एसी आणि कूलरलाही लागू आहे. पंख्याच्या खाचेत तेल ओता, त्यानंतर तुम्ही स्वत:च त्याचा वेग आणि त्यामध्ये झालेले बदल अनुभवू शकता. मुख्य म्हणजे वीजबिलाच्या आकड्यांमध्ये देखील तुम्हाला बदल दिसेल. वीज बिल कमी येईल.