Share

YouTube आणि Instagram वर फॉलोवर्स मिळवायचेत? ‘हे’ ऍप वापरा, क्रिएटर्ससुद्धा वापरताच ही पद्धत

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, तुम्ही लोकांना त्यांच्या कंटेंटवर लाखो व्ह्यूज आणताना पाहिले असेल. आजकाल अनेकजण आपल्या वेगवेगळ्या कंटेंटवर काम करताना पाहायला मिळत आहे.  विशेषत: इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूबवर अशा प्रकारचे भरपूर कंटेंट असते. कंटेंट क्रिएटर्स (निर्माते) त्यांच्या व्हिडिओ किंवा कंटेंटवर व्यूज मिळविण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.(YouTube, Instagram, Reels, Videos, Content, Creators)

मोबाइल इंटरनेट तंत्रज्ञान कंपनी AppyHigh च्या मते, भारतातील प्रभावक नाविन्यपूर्ण अॅप्स वापरत आहेत. या अॅप्सच्या मदतीने ते अनोखा कंटेंट तयार करत आहे तसेच हॅशटॅग आणि आकर्षक कॅप्शन वापरत आहे. या पद्धतींच्या मदतीने, कंटेंट क्रिएटर्स त्यांचा रीच तसेच फॉलोअर्स वाढवत आहेत.

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना हॅशटॅग वापरताना पाहिले असेल. विशेषतः कंटेंट क्रिएटर्स किंवा सोशल मीडिया प्रभावक त्यांच्या पोस्टमध्ये अनेक हॅशटॅग वापरतात. या हॅशटॅग्समुळे, कंटेंटचा रिच अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतो. क्रिएटर्स कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा अवलंब करून फॉलोअर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

AppyHigh नुसार, वापरकर्ते अधिक प्रभावी हॅशटॅगसाठी हॅशटॅग जनरेटर अॅप्स वापरत आहेत. Instore देखील असेच एक AI आधारित अॅप आहे. अॅपनुसार, त्याच्या वापरकर्त्यांनी एका महिन्यात सुमारे ५ लाख हॅशटॅग शोधले आहेत आणि ३०० दशलक्षाहून अधिक हॅशटॅग सूचना जनरेट केल्या आहेत.

Instore च्या हॅशटॅग जनरेट वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्त्यांना त्यांच्या कीवर्ड किंवा लोकप्रिय श्रेणींच्या ट्रेंडिंग हॅशटॅगबद्दल माहिती मिळते. या अॅपच्या मदतीने क्रिएटर्स केवळ हॅशटॅग शोधू शकत नाहीत तर त्याऐवजी, ते फोटो स्कॅन करून संबंधित हॅशटॅग देखील तयार करू शकतात.

इनस्टोअरवरील सुमारे १७% हॅशटॅग फोटो स्कॅन आणि अपलोड केले गेले आहेत. या अॅपच्या मदतीने वापरकर्ते कमी वेळात आणि मेहनतीत उत्तम कंटेंट तयार करू शकतात. लोक या अॅपवर प्रेम आणि नातेसंबंध, प्रवास, मजा आणि मनोरंजन आणि मूडशी संबंधित सर्वाधिक हॅशटॅग शोधतात.

महत्वाच्या बातम्या-
 माझ्या क्लिपा यूट्यूबवर टाकून 4 हजार जण कोट्यधीश, त्यांचं वाटोळं होईल, दिव्यांग मुलं जन्माला येतील
कीर्तनाच्या व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणाऱ्यांची मुलं अपंग जन्माला येतील; इंदुरीकरांनी केले पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
या खेळाडूने घेतला होता कधीच क्रिकेट न खेळण्याचा निर्णय, आता आहे IPL मधील संघाचा कर्णधार
जबरा फॅन! मुस्लिम युवकाने योगींचा थेट छातीवर गोंदवला टॅटू, मु्स्लिम समाज विरोध करत म्हणाला..

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now