आपण खूप श्रीमंत असावं असं प्रत्येकाला वाटत असते. त्यानुसार लोक बचत देखील करत असतात. मात्र, ही बचत योग्य ठिकाणी गुंतवली तर त्याचा परतावा अर्थात चांगला मिळतो. असाच एक गुंतवणूक करण्याचा मार्ग आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. यात दररोज केवळ 20 रुपये गुंतवणूक करून तुम्ही सहज कोट्याधीश होऊ शकता.
गुंतवणूक करून कोट्याधीश होण्याचे अनेक मार्ग असतात. अशा अनेक स्कीम आहेत, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक मालामाल होऊ शकता. मात्र या सगळ्या स्कीम गरीब, मध्यम वर्ग यांना लागू होतातच असं नसतं. कारण गुंतवणूक करण्याची रक्कम अधिक असते, जी भरणं सर्व सामान्यांना शक्य नसतं.
मात्र आता आम्ही तुमच्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक भन्नाट मार्ग सांगणार आहोत. या मार्गाने गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक सोपं होणार आहे. कारण यात तुम्ही फक्त रोजचे 20 रुपये गुंतवणे अपेक्षित आहेत. एवढी रक्कम तर अधिक गरीब व्यक्ती देखील गुंतवू शकतो.
नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे, त्यामुळे नवीन आर्थिक नियोजन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. अतिशय हुशारीने आणि योग्य ठिकाणी बचत करणं आवश्यक आहे. महागाईच्या या युगात मोठी बचत करणं थोडं कठीण आहे. परंतु, दररोज 20 रुपयांची बचत करणे कठीण नाही. दररोज केवळ 20 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून कोट्याधीश होण्याचं हे उद्दिष्ट साध्य करू शकता. म्युच्युअल फंडांनी गेल्या 25 वर्षांत खूप चांगला परतावा दिला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यात तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करू शकता, यासाठी जास्त पैशांची गरज नसते.
एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षापासून जर दररोज 20 रुपये वाचवायला सुरुवात केली, तर त्याचे एका महिन्यात 600 वाचतील. तीच रक्कम म्युच्युअल फंडात दरमहा 600 रुपये गुंतवले तर ती व्यक्ती कोट्यधीश होऊ शकते. यासाठी व्यक्तीला 40 वर्षे दरमहा 600 रुपये गुंतवावे लागतील, असे एकूण 2.88 लाख रुपये गुंतवले आणि या गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 15 टक्के व्याज मिळाले तर, 40 वर्षांत व्यक्ती 1.86 कोटी रुपये उभे करू शकतो.