Share

राज ठाकरे जरा वाघोलीचा आदर्श घ्या; मुस्लीम मंदीरात येतात तर हिंदू मशीदीत जाऊन प्रार्थना करतात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. (wangholi mosques and hanuman temple)

राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. असे असतानाच उस्मानाबादमधील एक गाव चांगलेच चर्चेत आले आहे. या गावातील लोकांनी याप्रकरणी मशिदींवरील भोंग्याचे जे प्रकरण सुरु आहे, त्याचा एका वेगळ्या प्रकारे निषेध केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या गावात मशिद व हनूमान मंदिर जवळजवळ असून दोन्ही धार्मिक स्थरावरील भोंगे हे आमनेसामने आहे. मंदिर-मशिद समोरासमोर असले तरी या गावात कित्येक वर्षांपासून शांतता आहे. मशिदीतील नमाज आणि मंदिरातील हनूमान चालिसा, आरती सुरु असताना दररोज लोकांच्या सहज कानी पडते. पण त्यावर कोणाचीही हरकत नाहीये.

वाघोली गावातील मंदिर आणि मशिदीचे स्थान गावकऱ्यांच्या मनात एक शांततेचं, श्रद्धेचं ठिकाण आहे. अनेकदा मुस्लिम भाविक हनूमान मंदिरात येऊन पूजा करतात. तर अनेक हिंदू भाविक मशिदीत जातात. गावात जयश्री राम, हनूमान यांच्यासोबतच अल्लाहू अकबर हा जयघोष सुद्धा एकत्र ऐकू येतो.

जातीयवादाची बीजे पेरणाऱ्या लोकांसाठी किंवा तशा प्रवृत्तीसाठी वाघोली गावातील लोकांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तसेच राज ठाकरे यांनी मशिदींबाहेर भोंग्यांवर हनूमान चालिसा लावण्याचे वक्तव्य केल्यानंतर या गावातील लोकांनी त्याला निषेध केला आहे.

राज्यात मंदिर आणि मशिदींवरुन कितीही राजकारण झालं तरी आमच्या गावातील शांततेवर याचा किंचितही परीणाम होणार नाही. आमच्यात असलेली एकजूट थोडी पण कमी होणार नाही, असे गावातील लोकांनी म्हटले आहे. सध्या या गावाची राज्यभरात चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
कीर्तनकाराचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृप्ती देसाईंचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या…
VIDEO: तेवतियाने 6 चेंडूत कुटल्या 24 धावा, गगणचुंबी षटकार पाहून हार्दिक पांड्यालाही फुटला घाम
लग्नाचे खरे वचन दिल्यानंतर केलेले शारिरीक संबंध म्हणजे बलात्कार नाही, हायकोर्टाने दिला महत्वपुर्ण निर्णय

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now