बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच प्रेक्षकांसाठी ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) ही नवीन अॅक्शन कॉप वेबसीरीज घेऊन येत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरीज प्रदर्शित होणार असून ही एक अॅक्शन-थ्रिलर सीरीज आहे. तर यामध्ये पोलीस म्हणून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.
‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) या सीरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये तो पोलीस अधिकारीच्या भूमिकेत असून नुकतीच सीरीजमधील त्याचा फर्स्ट लूक समोर आला होता. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही या सीरीजमधील फर्स्ट लूक लाँच करण्यात आला होता. यामध्ये पोलीस अधिकारीच्या रूपात शिल्पा दमदार अंदाजात पाहायला मिळाली होती.
सिद्धार्थ आणि शिल्पानंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची पोलीस अधिकारीच्या रूपात धमाकेदार एंट्री झाली आहे. हा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) या सीरीजमध्ये विवेक एका अनुभवी आणि सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. रोहित शेट्टीने नुकतीच विवेकचा फर्स्ट लूक रिव्हिल केला आहे.
रोहित शेट्टीने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर विवेकचा ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) सीरीजमधील लूक शेअर करत लिहिले की, ‘आमच्या स्क्वॅडमधील सर्वात अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटा. विवेक तुझे स्वागत आहे’. रोहितने विवेकचा फर्स्ट लूक रिव्हिल केला असला तरी यामध्ये त्याचे नाव विवेकच असेल की दुसरं काही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
तर रोहितच्या या पोस्टवर विवेकने कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, ‘धन्यवाद माझ्या भावा. प्रत्येक क्षणाचा अनुभव घेत आहे. माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत या स्केलवर मी कधी अॅक्शन चित्रपट ना पाहिला आणि ना केला. तुम्ही मास्टर आहात’.
याशिवाय विवेकनेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर सीरीजमधील त्याचा हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले की, ‘इंडियन पोलीस फोर्स’ (Indian Police Force) या बेस्ट फोर्समध्ये सामील झालो आहे. आणि रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सुपरकॉप झालो. अशा अद्भुत भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद रोहित भावा’.
विवेकने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये तो पोलीस अधिकारीच्या रूपात डॅशिंग अंदाजात दिसत आहे. खाकी वर्दी आणि हातात गन असा त्याचा लूक पाहून चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. तसेच विवेकच्या या पोस्टवर अनेक कमेंट करत त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही विवेकच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.
एका चाहत्याने विवेकच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, ‘शेवटी, दीर्घकाळानंतर तुझ्यासाठी योग्य अशी भूमिका मिळाली’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘आता सीरीज पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही’. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘बॉलिवूडचा सर्वात अंडर रेटेड अद्भुत अभिनेता आता परत आला आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
संजय दत्त ‘या’ अभिनेत्रीला म्हणाला सेक्सी; अजय, सलमान, अक्षयबाबतही केलं मोठं वक्तव्य
VIDEO: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोर खाली आला ड्रेस अन्…
VIDEO: नेहा कक्करने पुष्पाच्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, हॉट बिचवर दिसल्या हॉट अदा