काही दिवसांपूर्वी ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्रचंड चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी आता बॉलिवूडमधील सर्वात धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
‘कॉफी विथ करण’ च्या एका एपिसोडनंतर सुरु झालेलं नेपोटिझमचं वादळ काही थांबायचं नाव घेईना. अशातच आता विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखती दरम्यान, यावर भाष्य केलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना अमिताभ बच्चन यांना ‘माफिया’ म्हणत हिणावलं आहे.
विवेक अग्निहोत्री म्हणाले, बॉलिवूडमध्ये २००० सालानंतर नेपोटिझमला सुरूवात झाली. तोपर्यंत नेपोटिझम नावाचं वादळ इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. श्रीदेवी, अमिताभ आणि जितेंद्र हे देखील आऊटसाइडर होते. पण यांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच यांनी आपापसात मिळून माफिया गँग बनवली, असे धक्कादायक विधान अग्निहोत्रींनी केले.
तसेच म्हणाले, २००० नंतर बॉलिवूडमधील कुटुंबांनी बाहेरून येणाऱ्यांसाठी दरवाजे बंद केले. हुशार कलाकारांना बर्बाद करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. कलेचा दर्जा घसरतोय, त्याचं कारण देखील हेच आहे. चांगल्या कलाकारांना मागे रहावं लागत आहे.
एका डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनतो हे खूप सहज घडतं, काही करावं लागत नाही. पण बॉलीवूडमध्ये हे असं घडत असल्यानं अनेक अयोग्य कलाकार इथे काम करतायत, कलेचा दर्जा घसरतोय आणि चांगल्या कलाकारांना मागे रहावं लागत आहे, असे अग्निहोत्री म्हणाले.
तसेच म्हणाले, ‘अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा सगळेच आऊटसाइडर होते. श्रीदेवी, माधुरी दिक्षितही बाहेरच्या होत्या. हे सगळेच यशस्वी झाले. पण मग यांची मुलं आली, निर्माते, दिग्दर्शकांची मुलं आली, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही, पण जेव्हा अयोग्य गोष्टींना महत्त्व दिलं जातं तेव्हा मात्र राग येतो’, असे अग्निहोत्री म्हणाले.