Share

द काश्मिर फाईल्सच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा; म्हणाले, माझ्याकडे ७०० पेक्षा जास्त..

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. या पार्श्वभूमीवर विवेक अग्निहोत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. दिल्लीत या चित्रपटाचे प्रमोशन करताना, मी चित्रपटावर वेब सिरिज देखील बनवण्याचा विचार करत असल्याची माहिती अग्निहोत्रींनी दिली आहे.

त्यांनी सांगितले आहे की, या चित्रपटाला बनवण्यासाठी मी आणि माझ्या टीपने खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी मी चार वर्षे घालवली आहेत. माझ्याकडे एवढी साधन सामग्री आहे की, मी चित्रपटावर वेब सिरिज ही बनवू शकतो. पुढे त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे ७०० जास्त पेक्षा लोकांची आपबीती आहे.

याचा वापर करुन मी सहज वेब सिरिज बनवू शकतो. सध्या मी याचाच विचार करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. त्यामुळे टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासोबत अग्निहोत्रीनी सांगितले की, Global Kashmiri Pandit Diaspora यांनी कश्मिरी पंडितांना शोधण्यासाठी आम्हाला मदत केली.

तसेच, हे सर्व लोक एका हिंसाचाराचे विक्टीम आहेत. यांच्या कथा कोणीही एकलेल्या नाहीत. त्यामुळे यांना समोर आणण्याची गरज आहे. दरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची देशभर चर्चा सुरु आहे. राजकिय वर्तुळात देखील नेत्यांनी या चित्रपटाला नविन वादाचे कारण बनविले आहे. परंतु स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, द कश्मीर फाइल्ससारखे सिनेमे बनायला हवेत. असा सिनेमातून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणलं जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत.

संपूर्ण देशभरात वादाचे कारण बनलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच ११ मार्चला शुक्रवारी ३.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एका बाजूला या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी होत असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

महत्वाच्या बातम्या
“हिजाब बंदीमुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ”
अक्षय कुमारचे बॉडी डबलचे काम करायचा ‘हा’ डायरेक्टर, आता अक्षय त्याच्याच चित्रपटात काम करतो
हिजाब निकालावर कॉंग्रेसचा संतप्त सवाल; श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकताना हिजाब घालतात का?
‘2024 मध्ये मोदी युगाचा होणार अंत, बनणार युपीए सरकार’, ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now