काश्मिरी पंडितांवर आधारित असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अग्निहोत्री भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी त्यांच्यासोबत CRPF चे जवान असणार आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने अगदी नाजूक विषयात हात घालण्याचे काम केले आहे. या चित्रपटात थेट काश्मिरी पंडितांवर कसे अत्याचार झाले हे दाखवण्यात आले आहे.
त्यामुळे संपूर्ण देशभरात हा चित्रपट एका नवीन वादाचे कारण बनला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात दाखवण्यात आलेले सत्य मानणारा आणि चित्रपटात दाखवण्यात आलेले सत्य नाकारणारा गट देशात बनला आहे. सोशल मीडियावर तर या चित्रपटाविषयी मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी होताना दिसत आहे.
राजकिय वर्तुळात देखील ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट एक राजकिय मुद्दा बनला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे. सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने एकूण 79.25 कोटी रुपयांचे कलेक्शन जमा केले आहे.
प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या चित्रपटावर आधारित एक वेबसीरिज आणणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. याविषयी बोलताना विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे 700 पेक्षा जास्त काश्मिरी पंडितांची आपबिती आहे. त्यांचे दुःख त्यांच्या वेदना जगासमोर मांडण्याची गरज आहे.
या कारणाने मी काश्मिरी पंडितांवर आधारित वेब सिरीज आणण्याचा विचार करत आहे. मात्र वेब सिरीजबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याची माहिती अग्निहोत्री यांनी दिली आहे. दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा लोकांवर परिणाम होताना दिसत आहे.
अनेकजण या चित्रपटाच्या विरोधात तर काहीजण चित्रपटाच्या बाजूने उभे राहिलेले दिसत आहेत. त्यामुळे अशा तणावपूर्ण स्थितीत विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
“इस्लाम हाच आपल्या देशाचा खरा शत्रू” संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
“२०२४ च्या निवडणूकीत AAP आणि TMC च्या आघाडीत काँग्रेस लहान भावाची भूमिका स्विकारेल”
राखी सावंतचा ‘हा’ व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल
पवारसाहेब, ५५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा