पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर येणार विश्वास नांगरे पाटील? चर्चांना आले उधाण

आपल्या धडाकेबाजीमुळे बहुचर्चेत असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदी निवड झाल्याची चर्चा रंगली आहे. सध्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही बातमी एप्रिल फुलमुळे पसरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आयर्नमन कृष्ण प्रकाश आहेत. कृष्ण प्रकाश आपल्या कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या धडक कारवाईमुळे आतापर्यंत कित्येक गुंड सुतासारखे सरळ झाले आहेत. इतकेच नव्हे तर, आपल्या प्रेमळ स्वभावामुळे कृष्ण प्रकाश पोलीस कर्मचाऱ्यांचे आवडते अधिकारी बनले आहे.

कृष्ण प्रकाश आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून गेले आहेत. त्यामुळे खूप कमी काळात प्रकाश यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा सर्व स्थितीतच आज एप्रिल महिन्याची एक तारीख असल्यामुळे फसवेगिरीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत.

यातच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जागी नांगरे पाटील येणार असल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे. सगळ्या व्हाट्सअप ग्रुपवर एक मॅसेज व्हायरल झाला आहे. या मॅसेजमध्येच कृष्ण प्रकाश जागी नांगरे पाटील येणार असल्याचे सांगितले आहे. परंतु या मॅसेजनंतरच ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या व्हायरल मॅसेजची सत्यता समोर आल्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. तर काहींनी खरच कृष्ण प्रकाश लवकरच आपल्या पदावरुन नियुक्ती होणार आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. कारण की, याअगोदर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात झालेल्या दोन्ही पोलीस आयुक्तांना आपला कार्यकाळ पुर्ण करता आलेला नाही.

या दोघांनतर कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाचा कारभार सांभाळला आहे. परंतु त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे समजताच यावर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी नांगरे पाटील येणार नसल्यावर दुःख व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या
17 वर्षाच्या मुलीशी लग्न करण्याच्या हट्टापायी ज्युनियर NTR वर झाला होता गुन्हा दाखल, वाचा किस्सा
चाहत्यांना धक्का! विशाखा सुभेदारने हास्यजत्रेला ठोकला रामराम, म्हणाली, ‘असले घाणेरडे आरोप करू नका’
‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवीन ट्विस्ट, लग्नाच्या आधीच नेहा उचलणार मोठं पाऊल, आजोबांशी खोटं बोलून..
नेहा आणि यशची रेशीमगाठी जुळण्याआधीच तुटणार? आजोबांशी खोटे बोलणे नेहाला पडणार महागात