Share

अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदमही भाजपच्या वाटेवर? स्वत: स्पष्टीकरण देतं केला मोठा खुलासा

ashok chvhan
कॉंग्रेसला गळती लागल्याच चित्र आता पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चव्हाण – फडणवीस यांच्या भेटीनंतर आता राज्यात शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतं आहे. चव्हाणांसाठी थेट दिल्लीतून सूत्र हलली असून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) हेच यामागचे सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहे. जर चव्हाण भाजपमध्ये आले तर 15 आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आली असल्याच बोललं जातं आहे. तर आता कॉंग्रेसच्या गोटातून आणखी एक बातमी समोर येतं आहे.

काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जातं आहे. यामुळे आता कॉंग्रेसला आणखी धक्का बसणार असल्याच बोललं जातं आहे. अशातच विश्वजीत कदम यांनी भाजपवर प्रवेशावर सविस्तर भाष्य केलं आहे.

दरम्यान, भाजपच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना विश्वजीत कदम यांनी म्हंटलं आहे की, ‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मी पुन्हा यावर वक्तव्य करणं अपेक्षित नाही,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात काँग्रेसच्या बळावर सत्ता येणे अवघड असल्याचे चव्हाणांच्या लक्षात येऊ लागले होते. सत्ता गेली तर किमान मंत्रिपद तरी आपल्याकडे असावे, या भूमिकेतून भाजपकडे चर्चेसाठी चव्हाणांनी पुढाकार घेतला. त्यानंतर दिल्लीतून सूत्र हलली. भाजपने चव्हाणांसाठी ज्योतिरादित्य शिंदे यांना मैदानात उतरवले.

याचे कारण असे की, ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात चांगले संबंध होते. आणि दोन्ही नेते मुळ काँग्रेसचेच. त्यामुळे बोलणी करायला आणखी सोपे झाले, असं आता राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. चव्हाण यांनी किमान 15 आमदार सोबत आणावे अशी भाजपच्या वरिष्ठांची अपेक्षा असल्याच बोललं जातंय.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now