औरंगाबाद येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच,’ असा इशारा दिला. यामुळे पुन्हा चांगलच राजकारण ढवळून निघालं आहे.
औरंगाबादमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी ‘४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच,’ असा इशारा दिला. ‘मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर दे, असं ते म्हणाले.
राज ठाकरेंनी काल सभेदरम्यान बोलताना ‘लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करा,’ असं देशभरातील हिंदु बांधवांना आवाहन केले. मात्र चित्र काहीच वेगळं पाहायला मिळत आहे. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलसारख्या दोन मोठ्या हिंदु संघटनांना यातून माघार घेतल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरेंच्या आवाहनानंतर विश्व हिंदू परिषदेने यावर भाष्य करत राज ठाकरेंना एकाकी पाडल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘राज ठाकरे दुष्प्रचाराचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘विश्व हिंदू परिषद ही राजकीय संघटना नाही. कुठल्याही पक्षाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या भूमिकेशी विंहिंप सहमत नाही, असे त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाने पाठिंबा दिलेला नाही. मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेचं सर्व हिंदु संघटना स्वागत करतील असं बोललं जात होतं परंतु चित्र काहीच वेगळं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्यानंतर मनसेत नाराजीचा सुर; आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा
भाजप कार्यालयाबाहेर राज ठाकरेंची कार दिसल्याने राजकीय चर्चांना उधान; जाणून घ्या खरे कारण
राज ठाकरेंना पकडून कोर्टासमोर आणा; न्यायालयाचे मुंबई पोलिस आयुक्तांना स्पष्ट आदेश
आता काही खरं नाही! ठाकरेंना नडने पडले महागात; राणा दाम्पत्याच्या घरावरही गदा..