Share

VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..

बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व नुकताच संपन्न झाला. या सीझनमध्ये अभिनेता विशाल निकम हा विजेता ठरला. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल खूपच खुश असून सध्या सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यादरम्यान बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर विशालने पहिल्यांदा कीर्तनकार शिवलीला पाटील यांची भेट घेतली आहे. याचा एक व्हिडिओसुद्धा विशालने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विशालने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शिवलीला यांच्यासोबतचा एका व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते दोघे पंढरपूरातील चंद्रभागा नदीच्या तीराजवळ असल्याचे दिसत आहेत. यासोबत मागे माऊली माऊली हे गाणंसुद्धा वाजत आहे.

व्हिडिओ शेअर करत विशालने लिहिले की, ‘बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात… माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!’

यादरम्यान विशालने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने बिग बॉसच्या घरातील त्याच्या १०० दिवसांच्या प्रवासाबद्दल सांगितले. तसेच त्याच्या या विजयाने त्याचे आई-वडिल खूपच खुश असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

यादरम्यान विशालला सौंदर्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले असता त्याने सांगितले की, ‘माझ्या आयुष्यात खरंच सौंदर्या आहे. मी बिग बॉस शो जिंकल्यानंतर तिचा मला मेसेजही आला होता. लवकरच मी तिची भेट घेईन. त्यानंतर मी स्वतः सौंदर्या कोण आहे आणि तिचे खरे नाव काय आहे, याचा खुलासा करेन’.

महत्त्वाच्या बातम्या : 

अक्षय कुमारने चित्रपट साईन करण्यासाठी घेतले एवढे कोटी; बनला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता
कोरोनामुळे ठाकरे सरकारने निर्बंध केले कडक; लग्नाला ५०, तर अंत्यविधीला २० लोकांनाच असणार परवानगी
ऐकावे ते नवलच! परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी घेताहेत Study Drugs…

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now