बार्शी शहर व तालुक्यासह राज्यातील अनेक गुंतवणुकदारांना 18 कोटी 80 लाखांचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे पोलिसांना शरण आला. सोमवारी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमोर तो हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे ‘विशाल फटे’. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवून विशालने बार्शी, सोलापूरातील अनेकांना करोडोंचा गंडा घातला आहे. अखेर हा विशाल फटे सोलापूर पोलिसांसमोर हजर झाला असून, त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून तो एसटीने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. सुरवातीला त्याला कोणीच ओळखले नाही. मी विशाल फटे म्हणून त्याने स्वत:ची ओळख सांगितली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत विशाल फटेच्या विरोधात सुमारास ५० लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात आता आणखी लोक पुढे येण्याची शक्यता आहे तसंच ही रक्कम देखील वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, फटे याने एक व्हिडीओ प्रसारित केला असून त्याने त्यात स्पष्टीकरण दिलं आहे. त्या व्हिडीओत फटे म्हणतो, “अनेक लोकांनी माझ्या नावावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला. नेमकं प्रकरण मला माहित आहे. कोणाचेही पैसे बुडविण्याचा माझा कधीच विचार नव्हता आणि पुढेही नाही.
“सहा महिन्याच्या आत लोकांचे कॅपिटल परत केले आहे. गेल्या तीन चार महिन्यात मी कुठलाच नवीन क्लायंट घेतला नाही. माझ्याकडनं झालेल्या चुकीमुळं मला जे परिणाम भोगावे लागणार आहे त्याची मी मानसिक तयारी केली आहे.” “माझ्या घरच्यांचा माझ्या व्यवहाराशी कुठलाही संबंध नाही. अनेकांना मी व्यवसाय सुरू करायला मदत केली आहे. मी कोणालाही प्रलोभन दाखवलं नाही मी प्रॅक्टिकली ते करण्याचा प्रयत्न केला. मी संध्याकाळपर्यंत जवळच्या पोलीस स्टेशनला हजर होणार आहे,” फटे सांगतो.
महत्त्वाच्या बातम्या
सलमानवर सतत टीका करणाऱ्या अभिनेत्याचे सपशेल लोटांगन; म्हणाला तो माझा शत्रू नाही, तो तर..
जुही चावलावर फिदा होता आमिर खानचा ‘हा’ नातेवाईक; सेटवरच केला होता प्रपोज
ढिचँक पुजाचं नवीन गाणं ‘I Am A Biker’ रिलीज, गाणं पाहून नेटकरी म्हणाले, ‘देवाला तरी घाबर’
‘मॅचफिक्सींगसाठी मला ४० लाख रुपयांची ऑफर’, भारतीय क्रिकेटरचा खळबळजनक खुलासा