सर्वत्रच दीपावली सणाचा आनंद पाहायला मिळत आहे. मात्र अशातच क्रिकेट प्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेट महिला संघाच्या बसला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून क्रिकेट प्रेमींना जबर धक्का बसला आहे.
मिळालेल्या महितीनुसार, हा भीषण अपघात शुक्रवारी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या महितीनुसार, आंध प्रदेशमध्ये टुर्नामेंटसाठी जात असताना बडोदाच्या संघाच्या बसला विशाखापट्टणममध्ये हा अपघात घडला. धक्कादायक बाब म्हणजे, यात संघाची बसची एका ट्रकशी धडक झाली.
यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या महितीनुसार, विशाखापट्टणमच्या ज्ञानपुरममध्ये महिला क्रिकेट संघाची बस ट्रकला धडकली असून या अपघातात खेळाडू आणि प्रशिक्षकांसह 4 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, सुदैवानं कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नाही. अपघाताबाबत मिळालेल्या महितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये महिला सीनियर टी-20 चॅम्पियनशिप खेळून संघ आपल्या मूळ गावी वडोदरा येथे परतत होत्या. दिलासादायक बाब म्हणजे, कोणत्याही खेळाडूची आणि प्रशिक्षकाची दुखापत गंभीर नाहीये.
तसेच या सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या अपघाताबद्दल पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जखमी खेळाडू आणि संघासह प्रशिक्षक वडोदरा येथे परतले आहेत. सध्या सर्वांची प्रकृती चांगली आहे.
आनंदाची बाब म्हणजे, बडोदा आणि सौराष्ट्र संघांचा सामना 20 ऑक्टोबर रोजी डॉ. पीव्हीजी राजू एसीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विजयनगरम (आंध्र प्रदेश) येथे खेळवण्यात आलां. त्या सामन्यात बडोद्याने 7 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर संघ पुन्हा परतत असताना हा सामना घडला.
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…