Share

Virendra Sehwag : बाप बाप असतो! सेहवागशी पंगा घेत होता पाकिस्तानी चाहता, वीरुने सडेतोड उत्तर देत केली बोलती बंद

virendra sehwag

virendra sehwag answer to pakistani fans  | टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सध्या खुप खराब कामगिरी करताना दिसत आहे. पाकिस्तानचे दोन सामने झाले असून एकही सामना पाकिस्तानला जिंकता आलेला नाही. दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.

भारताचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. वीरेंद्र सेहवाग मजेदार ट्विट करण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तानच्या पराभवानंतर सेहवागने ट्विट केले, ज्यामुळे एका पाकिस्तानी चाहत्याला राग आला आणि तो म्हणाला तुमच्या संघाने कोणता वर्ल्डकप जिंकला आहे.

वीरेंद्र सेहवागने या पाकिस्तानी चाहत्याला उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली. झाले असे की. झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्विट रिट्विट करताना वीरेंद्र सेहवागने लिहिले, ‘हाहाहा…श्रीमान अध्यक्षांनी सुद्धा मस्त खेळी केली. त्यांनी शेजारच्यांची दुखती नस पकडली आहे.’

सेहवागच्या या ट्विटवर सहार नावाच्या पाकिस्तानी चाहत्याने रिप्लाय दिला होता. तो म्हणाला की, सेहवाग भाई जास्त हसू नका, तुम्ही कोणता वर्ल्ड कप जिंकला आहे. दुसऱ्यांच्या पराभवापेक्षा स्वत:च्या विजयात आनंदी झालं पाहिजे. तुम्ही जिंकाल तेव्हा आनंदी व्हा.

https://twitter.com/Sehar__56/status/1585683993395343361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585683993395343361%7Ctwgr%5E6d7481a5614ae4ec524d12abb2533cde3b1c771f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fvirender-sehwag-epic-reply-to-pakistani-fan-109372

या पाकिस्तानी चाहत्याला प्रत्युत्तर देताना सेहवागने लिहिले की, आम्ही तर २३ तारखेलाच खुप आनंदी झाला होतो. सेहवागचे हे ट्विट व्हायरल झाले असून आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर ८००० हून अधिक लोकांनी सेहवागच्या या रिप्लायला रिट्विट केले आहे.

https://twitter.com/Sehar__56/status/1585683993395343361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585685499888676864%7Ctwgr%5E6d7481a5614ae4ec524d12abb2533cde3b1c771f%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fvirender-sehwag-epic-reply-to-pakistani-fan-109372

२३ तारखेला भारत पाकिस्तानचा टी २० वर्ल्डकपमधील पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा सामना झिम्बाब्वेशी होता. त्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन्ही सामने गमावल्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेत टीकून राहणे कठीण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
keral : बहीणीच्या लग्नाला बापाने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बारावीतील मुलगी विकतेय शेंगदाने
BJP : “शिंदे-फडणवीस गुजरातचे एजंट आहे, ते उद्योग प्रकल्पांसाठी मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील”
zimbabwe : वर्षभरापूर्वी फाटके बुट घालून खेळला, आता पाकिस्तानविरुद्ध गाजवले मैदान; वाचा झिम्बाब्वेच्या ‘त्या’ खेळाडूबद्दल

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now