Share

विराट कोहलीचे RCB च्या कॅप्टनवर गंभीर आरोप; म्हणाला, तो माझं ऐकत नाही…

यंदाच्या आयपीएलच्या सिझनपूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या कर्णधारपदाची धुरा फाफ ड्यू प्लेसिसकडे देण्यात आली. फाफकडे कर्णधारपद दिल्यानंतर कोहली नाराज असल्याची चर्चा झाली होती. त्यातच आता फाफबाबत विराट कोहलीने एक धक्कादायक विधान केले आहे.

विराट कोहली ने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने आयपीएलच्या टीमचं कर्णधारपदंही सोडून दिलं. दरम्यान फाफकडे कर्णधारपद दिल्यानंतर कोहली नाराज असल्याचं बोलले गेले. सोशल मीडियावर विराट आणि फाफ ड्यू प्लेसिस मध्ये काही वाद असल्याचंही बोलले जात होते.

त्यानंतर आता विराट कोहलीने फाकवर मोठा आरोप केल्याची बातमी समोर येत आहे. विराट म्हणाला, फाफ एक असा व्यक्ती आहे, ज्याला स्वतःवर विश्वास आहे. शिवाय सामन्यादरम्यान त्याच्याकडे मैदानाचे पूर्ण अधिकार असतात. कधीकधी तो माझं ऐकत नाही. मी अनेकदा त्याला सल्ला देतो मात्र तो त्याला नकार देतो.

तसेच विराट हेही म्हणाला की, फाफ आणि माझी नेहमी चांगली मैत्री राहिली आहे. मी कोणता सल्ला दिला तर तो नकार देतो, पण त्याच्या या निर्णयाचा मी सन्मान करतो. असे विराट कोहली म्हणाला. विराटच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या मुद्यावरून चर्चेला उधाण आलं आहे.

सध्या, विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्सवर देखील चर्चा सुरू आहेत. यावर, फाफ म्हणतो की, विराट कोहली खूप जास्त मेहनत करत आहे. मात्र तो खराब फॉर्ममधून जात आहे. तो मेहनत करतोय फक्त त्याने पॉझिटिव्ह राहायला हवं. अनेक चांगल्या बाजू कोहलीकडे आहेत. आम्हाला आता पुढच्या सामन्याची तयारी करायची आहे.

विराटने आयपीएल 2021 च्या शेवटाला रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं कर्णधारपद सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फ्रेंचायझीने मेगा ऑक्शनमध्ये फाफ डू प्लेसीला खरेदी केलं आणि कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे दिली होती. बंगळुरू टीमचं मनोबल खचल्याचं फाफ डू प्लेसीने यावेळी सांगितले.

खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now