Share

‘मी लोकांना सांगू शकत नाही की कोणत्या परिस्थितीतून जातोय’, विराटचे खळबळजनक वक्तव्य

कर्णधार विराट कोहलीचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्यांच्या प्रत्येक एका कृतीवर चाहत्यांची बारीक नजर असते. नुकतेच विराटसंबंधीत एक पॉडकास्ट रॉयल चँलेजर बंगळूरूने सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या पॉडकास्टमध्ये विराटने आपल्या आयुष्याबदल महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

यामध्ये त्याने गोष्टी जेव्हा आपल्या बाजूने नसतात तेव्हा त्याच्याशी कसं डील करायचं याबाबत सांगितलं आहे. या पॉडकास्टमध्ये विराटला विचारण्यात आले होते की, फॅन्सने त्याच्या क्रिकेट करियरचा कोणता पैलू पाहिला नाहीये? यावर उत्तर देताना त्याने सांगितले की, “मी माझ्या बाजूला खडतर म्हणणार नाही.

मात्र ती वेळ जेव्हा तुम्ही एका खोलीत आत्मविश्वासाविना बसले असता, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगला खेळ करण्याचा विश्वास नसतो. तसंच हे विचार दूर कसे करायचे याबाबत तुम्हाला कल्पना नसते. तेव्हा काही सुचत नाही” पुढे त्याने म्हटले की, “जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा तुम्ही आपल्या अपेक्षांना कसं मॅनेज करायचं हा करियरचा सगळ्यात चॅलेंजिंग पॉईट असतो.”

इतकेच नव्हे तर, जेव्हा मला कोणता निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मी तो घेतो. मात्र तेव्हा लोकं त्यावर रिएक्ट करतात. ते विचित्र असते. मी गेल्या 7-8 वर्षांपासून खेळतोय. लोकं म्हणतात की, मी प्रत्येक सामना खेळला पाहिजे. दिवसाच्या शेवटी मी लोकांना हे सांगू शकत नाही की, एक व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जातोय, असे देखील विराटने यावेळी म्हटले आहे.

सांगण्यात येते की, २०१४ च्या काळात विराट आपली जागा निर्माण करण्यासाठी धडपड करत होता. चांगले खेळत असताना देखील त्याच्या हाती अपयश लागत होते. परंतु हे अपयश जास्त काळ टीकू शकले नाही. विराटने काही काळातच उभारी घेतली. दरम्यान येत्या ४ मार्चला विराट कोहली आपले १०० कसोटी सामने पूर्ण करणार आहे.

सध्याच्या काळात विराट आपल्या खेळात कमी पडताना दिसत आहे. विराटला आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीतील पहिल्या १० मधून काढण्यात आले आहे. याचा चांगलाच धक्का विराटला बसला आहे. त्यामुळे आता उद्याच्या मॅचमध्ये विराटकडेच सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! ‘या’ दोन शहरांत मांस आणि मद्यपानावर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
तारक मेहता फेम नट्टू काकांची शेवटची इच्छा ऐकून मुलालाही बसला होता धक्का
“सापाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं तेच पिल्लू आता वळवळ करत आमच्यावर फुत्कारतय”
‘पावनखिंड’ ओटीटीवर प्रदर्शित का नाही केला? चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली लोकांची मनं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now