virat kohli talking about goat | टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली सध्याच्या क्रिकेटमधील सर्वात्तम फलंदाज मानला जातो. अशा परिस्थितीत त्याला ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT) चा दर्जाही दिला जातो. क्रिकेटविश्वातील अनेक माजी खेळाडू आणि सोशल मीडियावरील चाहते त्याला अशी उपाधी देताना दिसतात.
अशात अलीकडेच विराट कोहलीने GOAT च्या लिस्टमधून आपले नाव काढून टाकले आहे. तसेच यावेळी त्याने दोन माजी दिग्गज खेळाडूंना ही पदवी दिली आहे, ज्यामध्ये माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या नावाचा समावेश आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितले की, त्याला क्रिकेट जगतात GOAT ही पदवी दिली जाते. पण तो स्वत:ला GOAT समजत नाही. तो म्हणाला, नाही, मी स्वत:ला क्रिकेटचा GOAT मानत नाही. माझ्या मते GOAT साठी फक्त दोनच खेळाडूंची नावे द्यायला हवीत, ज्यात सचिन तेंडुलकर आणि व्हिव्हियन रिचर्ड्सचे यांचे नाव असायला हवे.
क्रिकेटमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. त्याला पाहूनच विराटने त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. तसेच विराट कोहली हा नेहमीच वेस्ट इंडिजचा माजी फलंदाजी विवियन रिचर्ड्सचा चाहता आहे. त्यामुळे तो या दोघांनाच क्रिकेटमधले GOAT मानतो.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात झालेल्या टी २० विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीने शानदार नाबाद अर्धशतक झळकावले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ५३ चेंडूत ८२ धावांची महत्त्वपूर्ण आणि सामना जिंकणारी खेळी खेळली, त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध त्याने ६२ धावांची नाबाद खेळी खेळली.
विराट गेल्या काही दोन तीन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. पण त्यानंतर आशिया कपपासून तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. ज्यामुळे भारतीय संघासाठीही ते खुप फायदेशीर ठरत आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचे दोन सामने झाले असून भारताने हे दोन्ही सामने जिंकले आहे.
महत्वाच्या बातम्या-
eknath shinde : ‘महाराष्ट्र गुजरातमध्ये विलीन करा’; ब्राम्हण महासंघाने का केली अशी मागणी? जाणून घ्या..
congress : महाराष्ट्राचा आणखी एक प्रोजेक्ट गुजरातने पळवला; शिंदे – फडणवीस सरकारवर टीकेची झोड
Bachchu Kadu : रवी राणा हे फडणवीस आणि शाहांच्या जवळचे, त्यामुळे…; बच्चू कडू यांचे धक्कादायक वक्तव्य