virat kohli talk about hardik pandya | टी २० वर्ल्डकप २०२२ मधला भारतीय संघाचा पहिला सामना झाला. पाकिस्तानविरुद्ध असलेला हा सामना भारतीय संघाने ४ विकेट्सने जिंकला आहे. भारतीय संघाने जिंकलेल्या या सामन्याचा खरा हिरो विराट कोहली होता. त्याच्या जबरदस्त खेळी पुढे पाकिस्तानलाही गुडघे टेकावे लागले.
किंग कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तसेच त्याने गेल्या वर्षी पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. भारताच्या विजयानंतर विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारत-पाकिस्तानच्या या हाय-व्होल्टेज मॅचमध्ये विराट कोहलीच्या कारकिर्दीसमोर पाकिस्तानी गोलंदाजीची लाईन-लेन्थ शांत झालेली दिसली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर विराट कोहलीने स्वत: या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाची कमान आपल्या हाती घेतली.
तो शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि शेवटी आपल्या शानदार खेळाच्या जोरावर त्याने भारताला सामना मिळवून दिला. ८२ धावांची नाबाद मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा तो प्रचंड खुश दिसत होता. तसेच त्याने यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे.
आजचं वातावरण खुप भारी आहे. हार्दिक मला म्हणाला होता की तु विश्वास ठेव. नवाजकडे एक ओव्हर बाकी होती. क्रिझवर असल्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढलेला होता. पूर्वी मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली माझी खेळी सर्वोत्कृष्ट आहे असे मानायचो पण आता कदाचित माझी आजची खेळी सर्वोत्तम आहे असे मी म्हणेन. मी सर्व प्रेक्षकांचे खुप आभार मानतो त्यांच्यामुळेच मला ही मोठी खेळी खेळता आली.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकल्यानंतर विराट कोहली जेव्हा ब्रॉडकास्टरशी बोलत होता तेव्हा तो थोडा भावूक झाला होता. कोहलीच्या चेहऱ्यावर विजयाच्या आनंदासोबतच त्याच्या डोळ्यात अश्रूही होते. भारताच्या विजयावर तो इतका भावूक झाला की, माजी भारतीय प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी जेव्हा त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्याला काही बोलता येत नव्हते.
महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : सामन्यानंतर खुपच भावूक झाला विराट कोहली, राहूल द्रविडलाही मारली घट्ट मिठी; पहा भावूक करणारा व्हिडिओ
IND Vs PAK : वारसदार बाळासाहेबांच्या विचारांचे, अखंड हिंदुत्वाचे; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात शिंदेंची पोस्टरबाजी
Love Story : याला म्हणतात खरं प्रेम! पतीचा त्रास बघवत नव्हता, तर पत्नीने चक्क आपल्या पतीला केली किडनी दान