virat kohli superman catch | मेलबर्न येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी २० वर्ल्डकपमधील ४२ वा सामना खेळला गेला.हा सामना भारतीय संघाने ७१ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सूर्यकुमार यादवच्या ६१ आणि केएल राहूलच्या ५१ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ५ विकेट्स गमावून १८६ धावा केल्या.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाच्या संघाला कोणतीही कमाल करता आली नाही. त्यामुळे ११५ धावांवर संपुर्ण संघ बाद झाला. झिम्बाब्वेची पहिली विकेट डावाच्या पहिल्याच चेंडूवर पडली. ही विकेट घेताना विराट कोहलीने जबरदस्त कॅच पकडला आहे.
झिम्ब्बाब्वेचे दोन्ही सलामीवीर दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा होती मात्र भुवीने झिम्बाब्वेच्या डावावर पाणी फेरले. भारतासाठी पहिला चेंडू टाकताच भुवीने शानदार विकेट घेतली. संघासाठी मोठा फटका मारण्याच्या नादात मधेवरेने शॉट मारला आणि कोहलीने सुपरमॅन सारखी उडी मारत ती कॅच घेतली.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1589197692903002112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1589197692903002112%7Ctwgr%5Ee24fcef18ec3ab781ed1fde53b5020a73f510bb1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fvirat-kohli-wicket-reaction-video-ind-vs-zim%2F
मधेवरेने कव्हर ड्राईव्ह मारला होता. पण तितक्यात विराटने मोठी उडी घेत कॅच घेतला आणि सामनाच पलटवला. ही कॅच घेतल्यानंतर विराट कोहलीसुद्धा हैराण झाला होता. ही कॅच घेतल्यानंतर इतर खेळाडू सुद्धा त्याचे कौतूक करताना दिसले. या सुपरमॅन कॅचचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
दरम्यान, या सामन्यात भारताकडून रविचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतल्या आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद शमीने २, हार्दिक पांड्याने २ आणि भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने १-१ बळी घेतले. या सामन्यात गोलंदाज अतिशय किफायतशीर ठरले. तसेच त्यांनी विकेट्सही खुप लवकर घेतल्या.
तसेच फलंदाजी करताना भारतीय संघातील फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव, केएल राहूल यांनाच मोठी कामगिरी करता आली. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ६१ धावा केल्या. तर केएल राहूलने ३५ चेंडूत ५१ धावा केल्या. या सामन्यात विराट (२६), हार्दिक पांड्या (१८) आणि रोहित शर्मा (१५) यांना मोठी खेळता आली नाही.
महत्वाच्या बातम्या-
India : अखेर ठरलं! भारत सेमी फायनलमध्ये भिडणार ‘या’ संघासोबत, जाणून कधी आणि कुठे आहे सामना
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने विराट-रोहितला टाकलं मागे, टी २० वर्ल्डकपमध्ये शतक ठोकत केला ‘हा’ मोठा विक्रम
Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये