IND vs PAK | आज पाकिस्तानविरोधात भारताचा पहिला टी-२० विश्वचषक सामना पार पडला. नेहमीप्रमाणे या सामन्याने चाहत्यांचा श्वास रोखून धरला होता. पण शेवटी भारताने बाजी मारली आणि पाकिस्तानला धुळ चारली. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक भारतीय चाहता हीच प्रार्थना करत होता की, भारताने सामना जिंकावा आणि तसंच घडलं. सामना भारताने जिंकताच सगळीकडे फटाके वाजण्यास सुरूवात झाली आहे आणि लोकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
विजयाचे सगळे श्रेय एकाच व्यक्तीला जाते तो म्हणजे भारतीय संघाचा किंग कोहली. कोहलीने शेवटपर्यंत संघाची साथ सोडली नाही आणि तो मैदानावर टिकून राहिला. हार्दिक पांडयानेही त्याला साथ दिली पण तो शेवटपर्यंत टिकू शकला नाही. त्यानंतर दिनेश कार्तिक आला पण तो ही आऊट झाला. शेवटी अश्विनने एक रन काढून भारताला विजय मिळवून दिला.
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 31 धावांत 4 विकेट गमावल्या. दुसऱ्या षटकात केएल राहुलने विकेट गमावली. राहुलने 4 धावा केल्या. दुसरीकडे, हरिस रौफने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला (4) इफ्तिखार अहमदकडे झेलबाद केले. भारतासाठी हा मोठा धक्का होता.
सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या आणि सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हरिस रौफकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या आणि नवाजच्या 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाबर आझमकडे पांड्या झेलबाद झाला. यानंतर कार्तिक मैदानावर आला पण अवघी एक धाव काढून 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिजवानने त्याला यष्टिचित केले.
बाबर आझम खाते न उघडता 1.1 षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसरीकडे अर्शदीपने भारताला दुसरे यश मिळवून देत चौथ्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर रिझवानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने 13 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमदला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. इफ्तिखारने 34 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली.
14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने भारताला चौथी विकेट मिळवून देत शादाब खानला (5) सूर्यकुमार यादवकडे झेलबाद केले. यानंतर त्याच षटकाच्या (14) शेवटच्या चेंडूवर त्याने हैदर अलीची (2) विकेट घेतली. यादरम्यान सूर्यकुमार यादवनेही झेल घेतला. हार्दिक पंड्याने 16व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संघाची तिसरी आणि सहावी विकेट घेतली आणि मोहम्मद नवाजला (9) कार्तिकच्या हाती झेलबाद केले.
त्यानंतर अर्शदीपने भारताला सातवी विकेट मिळवून देत आसिफ अलीला कार्तिकच्या हाती झेलबाद करून अवघ्या 2 धावांवर बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीपची ही तिसरी विकेट होती. भुवनेश्वरने 20 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीचा झेल घेतला. आफ्रिदीने 8 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
विराटने पाकिस्तानच्या जबड्यातून हिरावला विजयाचा घास; एका वर्षाने भारताने घेतला बदला, तोही व्याजासह
Chandrakant Khaire : अब्दुल सत्तारांचा बंदोबस्त करणार, त्यांची सगळी लफडी.., चंद्रकांत खैरेंचा इशारा
MS Dhoni : मला वर्ल्डकपमध्ये घेतलं नाहीये त्यामुळे.., सामन्यापुर्वीच धोनीचे हैराण करणारे वक्तव्य, चाहतेही भावूक
shivsena : पुन्हा दगा! उद्धव ठाकरेंच्या ‘या’ लढाऊ वाघिनीचे थेट ठाकरेंवरच खळबळजनक आरोप, शिवसेनेत खळबळ
bjp : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा मोठी फूट; तब्बल चार आमदार नारायण राणेंच्या संपर्कात