Share

Virat Kohli : सामना जिंकवून आल्यानंतर खुपच भावूक झाला विराट, लहान मुलाप्रमाणे द्रविडला मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल

virat kohli rahul dravid

virat kohli rahul dravid meet video  | रविवारी टी २० वर्ल्डकप २०२२ च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. सामन्यात कधी पाकिस्तान तर कधी भारत जिंकेल असे वाटत होते. पण विराटच्या दमदार खेळीमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला गुडघे टेकावे लागले आणि भारतीय संघाने हा सामना जिंकला.

मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध जो ऐतिहासिक विजय मिळवला होता तो दीर्घकाळ स्मरणात राहील. विराट कोहलीने एकट्याने ८२ धावा करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली. तो या सामन्याचा हिरो होता आणि त्याने या सामन्यात पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे.

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव केला. प्रथम खेळताना पाकिस्तानने ८ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ६ विकेट्स गमावून मोबदल्यात १६० धावा करून विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरुवातीला हतबल होताना दिसत होता.

भारतीय संघाच्या फलंदाजीच्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. सूर्यकुमार यादवही काही चांगले शॉट्स खेळून बाद झाला. भारतीय संघाच्या चार विकेट लवकर पडल्या. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने डावाची धुरा सांभाळत जबरदस्त कामगिरी केली.

विराट कोहलीने अवघ्या ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या आणि शेवटपर्यंत क्रीजवर राहून संघाला विजयाकडे नेले. चाहत्यांना जुन्या विराट कोहलीची झलक पाहायला मिळाली आणि त्यामुळेच सध्या फक्त त्याच्याबद्दलच बोलले जात आहे. त्याचवेळी, सामन्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली मैदान सोडताना दिसला.

या व्हिडिओमध्ये तो मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. राहूल द्रविडची भेट घेतली तेव्हा विराटने लहान मुलाप्रमाणे द्रविडला घट्ट मिठी मारली होती. तसेच भावूक सुद्धा झाला होता. याशिवाय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही विराट कोहलीची भेट घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : तो मला म्हणाला होता की विश्वास ठेव…; सामना जिंकल्यानंतर विराटने ‘त्या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय
IND Vs PAK : अक्षर पटेल नॉट आऊट होता? रिझवानच्या हातात चेंडू नसतानाही आऊट दिल्यामुळे भडकले चाहते
sunil gavaskar : भारताच्या विजयानंतर गावसकरांमध्ये संचारलं लहान मुलं, पहा नेमकं केलं काय?

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now