गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट विश्वात अनपेक्षित घटना घडू लागल्या आहेत. या घटनांवरून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेटमधील काही मुद्यांवरून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात काही मतभेद असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे चाहते देखील या प्रकरणावरून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. त्यातच शनिवारी विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका मुलाखतीत पाकिस्तानचे क्रिकेटपटू रशीद लतिफ यांना सध्या भारतीय क्रिकेट संघात घडणाऱ्या घटनांवर काही प्रश्न विचारण्यात आले. यावर व्यक्त होताना क्रिकेटपटू रशीद लतिफ म्हणाले की, “विराटच्या आयुष्यात असा टप्पा येण्याचं कारण म्हणजे त्याचे भारतीय क्रिकेट बॉर्डशी असलेले मतभेद. विराटने जरी कर्णधारपद सोडण्याचं निर्णय वैयक्तिक असल्याचं सांगितलं असलं किंवा सौरव गांगुली ट्विट करून विराटच्या वैयक्तिक निर्णयाचं स्वागत जरी करत असला तरीही या दोघांमध्ये भांडणचं आहे, असे माझे स्पष्ट आहे.
“काही खेळाडू भावनाप्रधान असतात. त्यांना माहिती आहे की, विराट कोहलीसारख्या आक्रमक व्यक्तिला कसं आणि कधी भडकवायचं. जेव्हा त्याने टी२० कर्णधारपद सोडलं, तेव्हा थोड्या दिवसातच त्याला वन डे कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले. पण त्यांना हे समजत नाहीये की अशी खेळी करून तुम्ही विराट कोहलीच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटलाच धक्का पोहचवला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्या मुलाखतीत दिली आहे.
एकदिवसीय कर्णधार पदावरून अचानक काढल्यानंतर कोहलीने आपली बाजू पत्रकारांसमोर मांडली होती. त्यावेळी विराट कोहलीने आपल्याला कर्णधार पदावरून दूर करताना बीसीसीआयने कळवले नसल्याचा आरोप केला होता. त्यावेळी बीसीसीआयची बाजू अध्यक्ष सौरव गांगुलीने मांडली होती.
त्यांनतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवदिवसीय मालिकेसाठी जेव्हा संघ जाहीर केला, तेव्हा सुद्धा सौरव गांगुलीने विराटच्या विरोधात मत मांडले होते. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्यात वाद असल्याची चर्चा होत आहे. पण पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ याने केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कोहलीचा गेम करून गांगुलीने भारतीय क्रिकेटलाच हादरा दिला; दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
समाजवादीने राष्ट्रवादीला दिलेली जागा परत घेतल्याची बातमी खोटी; बड्या नेत्याने दिली वेगळीच माहिती
“एका जागेवर तरी स्वबळावर लढण्याची हिंमत दाखवा, कसे जाणार साडेतीन जिल्ह्यांपलीकडे?”