World Cup, Team India, Virat Kohli, Indian Idol, Rishi Singh/ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli )अशा लोकांपैकी एक आहे की, ज्याला जगात क्वचितच अस कोणी असेल जो त्याला पसंद करत नसेल. त्याच्या फलंदाजीचे संपूर्ण जग वेडे आहे. तो जेव्हा खेळाच्या मैदानावर येतो तेव्हा आजूबाजूच्या प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ निर्माण होते. म्हातारे असोत की तरुण, प्रत्येकाला त्याला फॉलो करायला आवडते.
विराट कोहलीचे इंस्टा वर जवळपास 217 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर कोहली इंस्टा वर 258 लोकांना फॉलो करतो. त्यापैकी तो एका तरुण गायकाचा तो जबरदस्त चाहता बनला आहे. या गायकाच्या आवाजाचा किंग कोहली इतका वेडा झाला आहे की, त्याने या व्यक्तीला इंस्टा वर मेसेजही केला आहे. यासंबंधीच्या गप्पाही सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.
विराट कोहली टीव्हीच्या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलमधील गायक ऋषी सिंगचा खूप मोठा चाहता झाला आहे. त्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने इंस्टावरुन गायकाला वैयक्तिकरित्या मेसेजही केला. त्यांच्या याच चॅटची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये विराट कोहलीच्या अभिनंदनाच्या संदेशाला उत्तर देताना ऋषी सिंगनेही त्याचे आभार मानले आहेत.
याबाबत माहिती देताना इंडियन आयडॉल शोचे होस्ट आदित्य नारायण म्हणाले की, “ऋषीने आपल्या परफॉर्मेंसने संपूर्ण जगाची मने जिंकली आहेत. एक खास व्यक्ती आहे ज्याने ऋषीचा परफॉर्मेंस पाहिला, ऐकला आणि वैयक्तिकरित्या मॅसेज दिला. मला जास्त काही बोलायचे नाही, तुम्हीच बघा विराट कोहलीने ऋषीला मेसेज केला आहे.
ऋषीला मेसेज करताना कोहलीने लिहिले, “काही वेळापूर्वी तुझा व्हिडिओ पहिला, तू कमाल करतोस. मी तुझ्या गायनाच्या प्रेमात आहे. खूप शुभेच्छा, देव तुम्हाला आशीर्वाद देवो.” यानंतर ऋषीने विराट कोहलीच्या मॅसेजला उत्तर देताना त्याचे आभार मानले. त्याचवेळी दुसऱ्या मेसेजमध्ये विराटने लिहिले की, ‘खूप प्रगती कर आणि देव तुमच्या पाठीशी आहे.’ ऋषी सिंह हा उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ऋषी जन्म होताच त्याची आई त्याला सोडून गेली.
इंडियन आयडॉल शो दरम्यान ऋषी सिंगने आपल्या दत्तक पालकांबद्दल सांगताना सांगितले की, ‘मी कुठेतरी सडलो असतो, मी त्यांच्यासोबत नसतो तर कदाचित जिवंत नसतो.’ हे लक्षात घेण्यासारखे आहे की, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात चांगलाच घाम गाळत आहे. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकून मायदेशी परतेल, अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli: संपुर्ण सामन्यात रोहित शर्माने विराटला स्वत:जवळ फिरकूही दिले नाही, हे होते त्यामागचे कारण
Virat kohli : विराटच्या चुकीमुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सुर्यकुमार झाला आऊट? सोशल मीडियावर होतोय ट्रोल, ‘त्या’ ओव्हरमध्ये काय घडलं?
Virat Kohli: विराटला आक्रमक फलंदाजी करताना पाहून राहुल द्रविडने आणि रोहितने त्याला पाठवला होता ‘हा’ संदेश