virat kohli fans angry on gautam gambhir | भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या ट्विटमुळे वादातही अडकत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. रविवारी भारतीय संघाचा टी २० वर्ल्डकपमधला पहिला सामना पार पडला. त्या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात विराट कोहलीने ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. इतक्या तणावपुर्ण वातावरणातही कोहली क्रिझवर टिकून राहिला आणि त्याने जी कामगिरी केली, तर खरंच आश्चर्याचा धक्का देणारी होती. त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की तोच क्रिकेटचा किंग आहे.
या विजयानंतर फक्त देशातच नाही, तर जगभरातून विराटचे कौतूक केले जात आहे. आयसीसीने सुद्धा विराटचे कौतूक केले होते. तसेच माजी भारतीय खेळाडू सुद्धा विराटचे कौतूक करताना दिसून आले. पण यावेळी गौतम गंभीरने जे ट्विट केले, त्यामुळे विराटचे चाहते खुप भडकले आहे.
विश्वचषकाला सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. खुप चांगली कामगिरी केली, अशा प्रकारचे ट्विट गौतम गंभीरने केले होते. या ट्विटमध्ये कुठेच विराटला उल्लेख केलेला नाही. तसेच हॅशटॅगमध्येही INDVsPAK असे लिहिण्यात आलेले होते.
https://twitter.com/GautamGambhir/status/1584158556290285568
गौतम गंभीरच्या या ट्विटमुळे चाहते खुपच संतापले. तसेच त्यांनी गौतम गंभीरला ऐकवण्यास सुरुवात केली होती एकाने म्हटले आहे कोहलीचे नाव घ्यायला लाज वाटते का? तर एकाने म्हटले की हाच वर्ल्डकपच्या आधी म्हणत होता की विराटला घ्यायला नको, आता त्यालाच ट्विटमध्ये टॅग केलं नाही. किती जळतो हा. तर एकाने म्हटल की कोहलीचा उल्लेख कर ट्विटमध्ये.
दरम्यान, भारत-पाकिस्तानचा सामना खुप थराराक झाला होता. पाकिस्तानने भारतीय संघाला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. पण ३१ धावांवरच भारतीय संघाने ४ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर विराट आणि हार्दिक पांड्याने ११३ धावांची दमदार कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
पुण्याहून दिवाळीसाठी निघालेला तरुण घरी पोहोचलाच नाही; वाचा रस्त्यात नेमकं घडलं काय?
विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; जे घडलं तर वाचून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
love story : डायलिसिसच्या त्रासामुळे खुप वैतागला होता पती, पत्नीने स्वत:ची किडनी देत त्रासातून केली सुटका