virat kohli crying in stadium semi final | टी २० वर्ल्डकप स्पर्धेत १० नोव्हेंबर रोजी भारताला इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि हेल्स या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजीचा धुव्वा उडवला. त्यांनी एकही विकेट न गमावता हा सामना सहज जिंकला आहे.
अशात इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहली निराश झालेला दिसला. यादरम्यान तो डोळे लपवतानाही दिसला. त्याच्या डोळ्यातही पाणी आले होते, पण त्यावेळी हार्दिक पांड्या त्याला मिठी मारताना दिसला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या १६ षटकांत लक्ष्य गाठले. पराभवानंतर लगेचच विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपली निराशा टोपीच्या मागे लपवताना दिसत आहे.
Virat Kohli got emotional afetr lossing semi final#ViratKohli pic.twitter.com/a66FQ3pgOE
— shavezcric (@shavezcric0099) November 10, 2022
इंग्लंडविरुद्ध १० विकेट्सने झालेल्या दारूण पराभवानंतर, माजी कर्णधार विराट कोहली मैदानातून डगआऊटकडे जाताना खूपच निराश दिसत होता. एवढेच नाही तर टोपीखाली केली आणि आपल्या डोळ्यांवर ठेवली. आपल्या भावना लपवून तो अत्यंत निराश झालेला दिसला.
अशा स्थितीत हार्दिक पांड्याने विराटला मिठी मारली आणि त्याचे सांत्वन केले. दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ खूपच भावूक आहे. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर बटलर आणि हेल्स यांनी शानदार अर्धशतके झळकावली. त्याच्या खेळीमुळे इंग्लंडने भारताला १० विकेट्सने सामना जिंकला.
या डावात इंग्लंडच्या संघाच्या एकाही फलंदाजाची विकेट घेण्यात एकाही भारतीय गोलंदाजाला यश मिळाले नाही. ऍलेक्स हेल्सला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना नाबाद ८७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटने ४ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार ठोकले.
महत्वाच्या बातम्या-
‘कोई था जो विकेट के पिछे रहकर मॅच पलट देता था…’; पराभवानंतर चाहत्यांना आली धोनीची आठवण
वर्ल्डकपमधील मानहानीकारक पराभवानंतर पहीली कुऱ्हाड रोहीतवर; पांड्या होणार नवा कर्णधार
शामी-भुवीच्या निष्काळजीपणावर संतापला रोहित; चालू मॅचमध्येच झाप झाप झापले, व्हिडीओ व्हायरल