Share

कॅप्टन कुल धोनीच्या जाळ्यात अडकला विराट कोहली, अशी फिल्डींग लावली की झाला आऊट, पहा व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमध्ये कर्णधार नाही. या सिजनला सुरुवात होण्याच्या केवळ 2 दिवस आधी त्याने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. त्याच्या जागी रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) संघाची कमान सोपवण्यात आली आहे. धोनीची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई 4 वेळा चॅम्पियन बनले आहे.(Virat Kohli caught in Captain Kul Dhoni’s trap)

धोनी हा अत्यंत हुशार कर्णधार मानला जातो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातही त्याने ते सिद्ध केले. त्याने आपल्या एका युक्तीने विराट कोहलीला आऊट केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्याच्या खेळाची स्तुती करत आहेत.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने आरसीबीला 217 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस लवकर बाद झाला. यानंतर आरसीबीचा डाव सांभाळण्याची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर आली. चेन्नईला या सिजनमधील पहिला विजय नोंदवण्यासाठी कोहलीला लवकर बाद होणे आवश्यक होते.

तसे करण्यात चेन्नईला यश आले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मात्र, धोनीचा विचार वेगळा होता. आरसीबीच्या डावाच्या पाचव्या षटकात त्याने हा नमुना दाखवला. आरसीबीच्या डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी मुकेश चौधरी आला. या ओव्हरपूर्वीच धोनीने अचानक फाइन लेगवर उभ्या असलेल्या शिवम दुबेला डीप स्क्वेअर लेगला जाण्यास सांगितले.

मुकेशने ओव्हरचा पहिला चेंडू टाकला, त्यावर कोहलीने एरियल शॉट खेळला आणि चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. जिथे शिवम दुबे आधीच तैनात होता. त्याने कोहलीचा सहज कॅच घेतला. धोनीच्या या एका युक्तीने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतण्यास भाग पाडले. समालोचक संघही धोनीच्या या निर्णयावर बोलताना दिसत होता. विराटकडे चेंडू टाकण्यापूर्वी धोनीने क्षेत्ररक्षणात कसे किरकोळ बदल केले आणि परिणामी चेन्नईला कोहलीची मोठी विकेट मिळाली हेही त्यांनी सांगितले. त्याला केवळ 1 धाव करता आली.

महत्वाच्या बातम्या-
धोनीमुळे मला प्रेरणा मिळते कारण..; KGF फेम यशच्या वक्तव्याचं होतंय कौतुक, मानतो धोनीला आदर्श
बाकीचे १० जण काय लस्सी प्यायला गेले होते का? विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी संतापला
बायकोने धोका दिला, धोनीमुळे संघात मिळाली नाही जागा, तरीही हार न माननारा DK, वाचा प्रेरणादायी स्टोरी
IPL मध्ये डेब्यु करणारा खेळाडूच निघाला धोनीच्या वरचढ, रिव्ह्यू घेतला अन् धोनीला पाठवलं तंबूत; पहा व्हिडिओ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now