virat kohli break from t 20 cricket | भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशिया कप आणि टी २० वर्ल्डकपमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही कसोटी सामन्यात विराट कोहली पुर्णपणे फ्लॉप ठरताना दिसला.
पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १ आणि १९ धावा केल्या तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने २४ आणि १ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट त्याच्या कारकिर्दीला साजेल अशी कामगिरी करताना दिसून येत नसल्याचे म्हटले जात आहे.
अशातच आपली कामगिरी लक्षात घेता विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलपर्यंत एकही टी २० सामना भारतीय संघाकडून खेळणार नसल्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे. पण या निर्णयाची माहिती त्याने बीसीसीआयने दिली नसल्याचे म्हटले जात आहे.
विराट कोहली गेल्या दोन कसोटी सामन्यात पुर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे आता विराटने भारत-श्रीलंका मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने टी २० क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२३ मध्ये विराट कोहली थेट आयपीएल खेळण्यासाठी उतरणार आहे. तसेच जर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी झाली नाही तर यापुढे विराट कोहली कधीच भारताकडून टी २० क्रिकेट खेळणार नसल्याचे समजते आहे. पण जर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर तो लगेचच भारताचा संघात दाखल होईल.
२०२३ मध्ये भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे भारतासाठी २०२३ हे वर्षे खुप महत्वाचे असणार आहे. भारतात वनडे वर्ल्डकप असल्यामुळे विराट कोहली सुद्धा याच्या तयारीला लागला आहे. भारताला वनडे वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी त्याने थेट टी २० क्रिकेटमधूनच काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
anil deshmukh : अन् अश्रूंचा फुटला बांध..वर्षभरानंतर पतीला भेटताच अनिल देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर
‘दारूचे व्यसन करू नका’ म्हणून केंद्रीय मंत्री करतोय विनवणी, देतोय स्वतःच्याच मुलाचे उदाहरण
pankaj deshmukh : देशासाठी काय पण! मोठा मुलगा शहीद झाला असतानाही आईने दुसऱ्या मुलाला केलं सैन्यात भरती