Share

विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० सिरीजमधून बाहेर, ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळाली जागा

भारत आणि वेस्ट इंडिजमधील टी-20 सामन्याला बुधवापासुन सुरूवात झाली आहे. या सामन्यांच्या दरम्यान खेळाडुंमध्ये चांगलीच रणधुमाळी पाहिला मिळत आहे. उद्या वेस्ट इंडिजविरूद्धातील तिसरा टी-20 सामना देखील पार पडणार आहे. या पार्श्वभुमीवर या तीसऱ्या सामन्यातुन विराट कोहलीला वगळण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

विराट कोहली आणि ऋषभ पंतला बायो बबलमधून 10 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. याकारणाने विराट उद्याच्या सामन्यांमध्ये दिसणार नाही. यामुळे विराटच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. याबाबत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, विराट आणि पंत श्रीलंकेविरोधात होणाऱ्या सामन्यांमध्ये दिसणार नाही.

त्यामुळे आज सकाळीच विराट आपल्या घरी रवाणा झाला आहे. इतकेच नव्हे तर, सगळ्या फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेलाडूंना बायो बबलपासून नियमितरित्या ब्रेक देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. खेळाडुंच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी बोर्डाने हे पाऊल उचल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

मात्र तरी देखील श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या दोन टेस्ट सामन्यांसाठी कमबॅक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या बाजुला ट्वेन्टी-20 मालिकेतुन विराटने विश्रांती घेतल्यानंतर भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सामन्यांकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

काल पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात विराट कोहली चांगलाच झळकला आहे. या सामन्यात विराटने 41 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकत 52 धावा केल्या आहेत. इतकेच नव्हे तर, या सामन्यामध्ये भारताने 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच सामन्यांना सुरूवात होण्याअगोदर एका पत्रकार परिषदेत रोहित शर्माला विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्स विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित मीडियावर चांगलाच फडलेला दिसला. त्यानंतर आता विराट कोहलीला ब्रेक दिल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या
भयानक! शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, २०० फुट दरीत कोसळली मोटारसायकल
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ च्या चाहत्यांना धक्का, ‘या’ कारणामुळे लवकरच मालिका होणार बंद?
तूच रे तूच! ‘हा’ मुस्लिम मावळा शिवनेरीवरून २०० किलोमीटर गावात पायी आणतो शिवज्योत 
सत्तेचा माज! शिवसेना आमदाराकडून भावजयीस बेदम मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

खेळ आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now